agricultural stories in marathi, agro vision, Aquaponic farming innovative projects | Agrowon

अॅक्वापोनिक्स शेतीसाठी नावीन्यपूर्ण मॉडेल्स
वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

आफ्रिकेतील ग्रामीण भागांमध्ये अॅक्वापोनिक्स तंत्रज्ञान पोचवण्याच्या उद्देशाने डर्बन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. २०१६ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी अॅक्वापोनिक्स पद्धतीची विविध मॉडेल्स तयार केली आहेत. यामध्ये टाकाऊ प्लॅस्टिक व टाक्यांचा वापर केला आहे. आयलेम्बे जिल्ह्यातील नुड्सबर्ग समुदायामध्ये अॅक्वापोनिक्स तंत्रज्ञान रुजवण्यासाठी इनॅक्टस ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेचे साह्य मिळाले आहे. फोर्ड मोटर्सद्वारे अर्थसाह्य करण्यात आले आहे.

आफ्रिकेतील ग्रामीण भागांमध्ये अॅक्वापोनिक्स तंत्रज्ञान पोचवण्याच्या उद्देशाने डर्बन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. २०१६ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी अॅक्वापोनिक्स पद्धतीची विविध मॉडेल्स तयार केली आहेत. यामध्ये टाकाऊ प्लॅस्टिक व टाक्यांचा वापर केला आहे. आयलेम्बे जिल्ह्यातील नुड्सबर्ग समुदायामध्ये अॅक्वापोनिक्स तंत्रज्ञान रुजवण्यासाठी इनॅक्टस ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेचे साह्य मिळाले आहे. फोर्ड मोटर्सद्वारे अर्थसाह्य करण्यात आले आहे.

अॅक्वापोनिक्स म्हणजे अॅक्वाकल्चर (मत्स्यशेती) आणि हायड्रोपोनिक्स ( मातीरहीत शेती) यांचे मिश्रण आहे. माशांचे टाकाऊ पदार्थ हे पिकांसाठी पोषक घटक म्हणून उपयुक्त ठरतात. अॅक्वापोनिक्स तंत्रामध्ये पाण्याचा अत्यंत कमी प्रमाणात वापर होतो. अन्नद्रव्यांचा कार्यक्षमपणे पुनर्वापर होतो. त्याचप्रमाणे जागाही कमी लागते. या पद्धतीमध्ये रसायनांचा वापर केला जात नाही. परिणामी, सेंद्रिय भाज्यांना चांगले दर मिळू शकतात. आफ्रिकेतील ग्रामीण भागामध्ये भाज्यांच्या उत्पादनासाठी या तंत्राचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातून ग्रामीण भागामध्ये उद्यमशीलता आणि रोजगाराची उपलब्धता वाढवता येईल, असा विश्वाय संशोधकांना वाटतो. त्यामुळे स्थानिक उपलब्ध घटकांतून अॅक्वापोनिक्स पद्धतीचे विविध मॉडेल तयार केले आहेत. त्या विषयी माहिती देताना गेल्या दोन वर्षांपासून अॅक्वापोनिक्स फार्मिग प्रकल्पाला चालना देणारे ‘इनाक्टस’चे अध्यक्ष लुवो गुगवाना यांनी सांगितले, की अॅक्वापोनिक्स हे नावीन्यपूर्ण तंत्र आहे. मात्र, त्याचा सुरवातीचा खर्च अधिक असून, तो कमी करण्यासाठी स्थानिकरीत्या उपलब्ध घटकांचा वापर वाढवला जात आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जात आहेत.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...