agricultural stories in marathi, agro vision, Aquatic plant may help remove contaminants from lakes | Agrowon

जल वनस्पती कमी करतील तलावातील प्रदूषण
वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

तलावातील प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींचा वापर करणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत साउथ डाकोटा राज्य विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये डकवीडसारख्या वनस्पती तलावाच्या पाण्यातील स्फुरद आणि नायट्रेट घटकांचे व जड धातूंचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. या वनस्पतींचा वापर पशुखाद्यासाठीही होऊ शकतो.

तलावातील प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींचा वापर करणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत साउथ डाकोटा राज्य विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये डकवीडसारख्या वनस्पती तलावाच्या पाण्यातील स्फुरद आणि नायट्रेट घटकांचे व जड धातूंचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. या वनस्पतींचा वापर पशुखाद्यासाठीही होऊ शकतो.

साउथ डाकोटा राज्यातील पाण्यामध्ये डकवीड या वनस्पतींची वाढ कऱणे आणि त्याचा पशुखाद्यासाठी वापर करणे यासाठी एका संशोधन प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. या पाणी प्रकल्पामध्ये डकवीड वेगाने वाढले. दर आठवड्याला शेकडो किलो डकवीड त्यातून उपलब्ध झाले. पाण्यातील स्फुरदाचे प्रदूषण कमी करण्यासाठी डकवीडचा वापर करणे शक्य असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. ही वनस्पती पाण्यामध्ये वेगाने वाढते. तिला गरम आणि सावकाश प्रवाहित होणारे पाणी मानवते. पाण्यातून या वनस्पतींची काढणी करणे सोपी आहे. ते ताज्या किंवा वाळवलेल्या स्वरूपामध्ये जनावरांना खाद्य म्हणून देता येते. त्यात प्रथिनांचे प्रमाण १६ टक्के आहे. त्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी या वनस्पतींच्या वापरासाठी अभ्यास करण्यात येत आहे.

पशुखाद्यामध्ये वापरण्यासंदर्भात अभ्यास ः
प्राणीशास्त्र विषयाच्या प्रा. ज्युली वॉकर यांनी डकवीड वाळवून, त्याचा कमी प्रमाणात पशुखाद्यामध्ये वापर कऱण्यासंदर्भात अभ्यास केला. हे पशुखाद्य ६० ते ९० दिवसांपर्यंत ठेवल्यानंतर त्यातील प्रथिनांचे प्रमाण किचिंत कमी होते. ९० दिवसांपर्यंत साठवल्यास त्यात अमोनियाची वाढ होते. या अभ्यासात कोणतीही विषारी घटकांची निर्मिती झाल्याचे आढळले नाही. अर्थात, पुढील टप्प्यामध्ये डकवीड आणि त्यात शोषलेले जड धातूंच्या जनावरांवरील परीणामांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...