कृत्रिम बुद्धिमत्ता देतेय संशोधनाला गती

कृत्रिम बुद्धिमत्ता देतेय संशोधनाला गती
कृत्रिम बुद्धिमत्ता देतेय संशोधनाला गती

शेती, पीक उत्पादन आणि अन्नधान्यातील संशोधनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. त्याचबरोबरीने अलीकडे आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर माहितीच्या विश्लेषणासाठी करण्यात येत आहे. अमेरिकेतील स्टॅन्डफोर्ड विद्यापीठातील तज्ज्ञ सध्या विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत अधिक संशोधन करीत आहेत. या माध्यामातून शेती तसेच इतर क्षेत्रांतील माहितीचा काटेकोर विश्लेषणातून वापर योग्य पद्धतीने करणे शक्य होणार आहे.

जगभरात शेती, आहार आणि आरोग्याबाबत जागृती होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पोषणयुक्त अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी योग्य वेळी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असते. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची मदत महत्त्वाची ठरत आहे. शेतीमध्ये लावलेले सेंन्सर संगणक प्रणालीला जमिनीतील ओलावा, पीकवाढ, कीड-रोगाचा प्रादुर्भाव, तापमानातील बदलांबाबत सातत्याने माहिती नोंदवितात. या माहितीचे विश्लेषणकरून निश्चितपणे पीक उत्पादनवाढीचा अंदाज घेणे शक्य होते. यातून योग्य पीक उत्पादनवाढ, शेतमालाचा योग्य वापर आणि नासाडी कमी करणे शक्य होईल.

  • कॉर्नेल विद्यापीठातील तज्ज्ञांनी एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये असे नोंदविण्यात आले होते, की शेतीमध्ये बसविलेले सेंन्सर आणि संगणक प्रणालीमुळे साबुकंद पिकावरील ठिपक्याच्या रोगाचे निदान ९८ टक्के खरे ठरले. एका रोबोटिक कंपनीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून तण नियंत्रण आणि फळाची काढणी करणाऱ्या रोबोनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. एक कंपनी संत्रा फळे तोडणारा रोबो तयार करीत आहे. यातून निश्चितपणे मजुरी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहेत. रोबोच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनातील इतर माहिती गोळा करणे शक्य होणार आहे.
  • जमिनीमध्ये अनेक उपयुक्त जिवाणू कार्यरत असतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता सांभाळली जाते. जमिनीच्या सुपीकतेवरच पीक उत्पादन अवलंबून असते. हे लक्षात घेऊन ट्रेस जिनोमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून विविध जिवाणूंचा जनुकीय अभ्यास करून त्यानुसार नेमके कोणते घटक जमिनीत मिसळले पाहिजेत, याबाबतची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • पर्यावरणाचे बदलणारे संतुलन, वनस्पती आणि प्राण्यांमधील आजारांचे बदलते स्वरूप, हवामान बदल या गोष्टींचा शेती आणि मानवी जीवनावर परिणाम होतो. या परिणामांचा जलदगतीने अभ्यास करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त ठरणार आहे. या माध्यमातून जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण करून संशोधनाला नवी दिशा निश्चितपणे मिळत आहे.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com