वनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी एसआरएनए ठरतील उपयुक्त

वनस्पतींना रोगापासून वाचवण्यासाठी एसआरएनए ठरतील उपयुक्त
वनस्पतींना रोगापासून वाचवण्यासाठी एसआरएनए ठरतील उपयुक्त

वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये सातत्याने एक युद्ध सुरू असते. त्यामध्ये हत्यार म्हणून लहान आरएनए (sRNA) या मूलद्रव्याचा वापर दोन्हीकडून होत असतो. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-रिव्हरसाईड येथील संशोधकांनी बॉट्रायटिस सिनेरिया या बुरशीजन्य रोगाला प्रत्युत्तर म्हणून वनस्पतीकडून वापरल्या जाणाऱ्या लहान आरएनएच्या गठ्ठ्याचे व त्याच्या वितरण पद्धतींचा अभ्यास केला आहे. हा रोग स्ट्रॉबेरी, टोमॅटो, आणि जवळपास सर्व फळे आणि भाज्यांसह फूलपिकांवर येतो. हे संशोधन जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

विद्यापीठातील नैसर्गिक आणि कृषी शास्त्र महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र आण वनस्पती विकृतीशास्त्राचे प्रा. हेलिंग जिन यांनी वनस्पतींची प्रतिकारशक्ती आणि रोग यांतील एसआरएनए या घटकांच्या भूमिकेचा अभ्यास केला. वनस्पतीवर येणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा शोध घेण्यासाठी झालेल्या या अभ्यासामध्ये मूलभूत तंत्राविषयी माहिती मिळाली आहे. या संपूर्ण तंत्रामध्ये वनस्पती आणि रोग या दोघांकडूनही एसआरएनएची देवाणघेवाण होत राहते. हे घटक जनुकांच्या कार्यान्वित होण्यासोबत विविध जैविक प्रक्रिया नियंत्रित करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावतात. रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पतीच्या पेशीमध्ये यजमानची प्रतिकारकता कमी करण्यासाठी त्याचा वापर करतो. तर वनस्पतीही त्याच्याच आधार रोगकारक घटकांना रोखण्याचा प्रयत्न करते. जीन व त्यांच्या गटाला वनस्पतीमध्ये बॉट्रायटीस सिनेरिया या रोगाच्या प्रादुर्भावादरम्यान वनस्पतींच्या पेशी बुडबुड्याप्रमाणे एसआरएनएचे गठ्ठे (त्याला ‘एक्सोसोम्स’ असे म्हणतात.) प्रादुर्भावित भागाजवळ पाठवत असल्याचे आढळले. बुरशीच्या पेशींनी कार्यक्षमपणे त्याचा स्वीकारही केल्याचे दिसले. त्याविषयी माहिती देताना संशोधिका जीन म्हणाल्या की, वनस्पतीवर येणाऱ्या रोगांना लक्ष्य करण्यासाठी योग्य वितरण व्यवस्था निर्माण करण्यामध्ये एसआरएनए हे मोलाची भूमिका निभावू शकतील. त्याचा फायदा रोगांचा प्रादुर्भाव पर्यावरणपूरक पद्धतीने रोखण्यासाठी होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com