agricultural stories in marathi, agro vision, Bees love blue fluorescent light, and not just any wavelength will do | Agrowon

निळ्या रंगाकडे मधमाश्या होतात आकर्षित
वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

अमेरिकेतील ओरेगॉन राज्य विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात निळ्या चमकदार रंगातील विशिष्ठ तरंगलांबीचा प्रकाश मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना आपल्या पिकांकडे फुलोऱ्यांच्या एक ते दोन आठवड्यांच्या विशिष्ठ कालावधीमध्ये मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी होऊ शकेल.

अमेरिकेतील ओरेगॉन राज्य विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात निळ्या चमकदार रंगातील विशिष्ठ तरंगलांबीचा प्रकाश मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना आपल्या पिकांकडे फुलोऱ्यांच्या एक ते दोन आठवड्यांच्या विशिष्ठ कालावधीमध्ये मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी होऊ शकेल.

परागीकरणासाठी मधमाश्या अत्यंत महत्त्वाच्या असून, अमेरिकी अर्थव्यवस्थेतील सुमारे १०० व्यावसायिक पिकांमध्ये त्यांची कमतरता भासत आहे. याचा सुमारे १५ अब्ज डॉलरइतका फटका बसत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मधमाश्यांना पिकांकडे आकर्षित करण्यासाठी योग्य तरंगलांबीचा प्रकाश शोधण्यासाठी भौतिकशास्त्र विषयातील संशोधिका ओक्साना ओस्ट्रोव्हेरखोवा यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, निळ्या रंगाचा चमकदार प्रकाशाकडे मधमाश्या आकर्षित होतात. थोडक्यात, या रंगाच्या प्रकाशाला त्या टाळूच शकत नाहीत. केवळ दृष्टीला दिसणाऱ्या रंगापेक्षाही त्यांच्या वर्तनातील कोणतीतरी बाब त्यांना तिकडे खेचत असल्याचे स्पष्ट जाणवते.

माणसांच्या नजरेपेक्षा भिन्नता ः

  • मधमाश्यांमध्ये माणसांप्रमाणेच ट्रायक्रोमॅटिक म्हणजेच तीन प्रकारचे फोटो रिसेप्टर असलेली दृष्टी असते. माणूस आणि मधमाश्या दोघांमध्ये निळ्या आणि हिरव्या रंगाचे रिसेप्टर सारखे असतात. मात्र, तिसरा रिसेप्टर माणसांमध्ये लाल रंगाचा, तर मधमाश्यांमध्ये अतिनील किरणांचा असतो. खरेतर ही किरण इलेक्टोमॅग्नेटिक ऊर्जेची कमी तरंगलांबीची असून, ती माणसांच्या नजरेच्या कक्षेबाहेर असतात.
  • फुलांचे चमकदार रंग आणि पॅटर्न त्यांना केवळ अनिनील किरणांच्या नजरेद्वारे दिसतात. मधमाश्या गोळा करत असलेल्या फुलातीस मधूरसातून ऊर्जा, तर परागांमधून प्रथिने मिळवतात. या प्रक्रियेमध्ये पुंकेसरावरील पराग हे स्त्री केसरावर पडतात.

असे आहेत संशोधनाचे निष्कर्ष ः
नैसर्गिक प्रकाशामध्ये निळ्या रंगाची तरंगलांबी मोठी आहे. सूर्यप्रकाशातील हिरव्या रंगाच्या शेवटापासून जांभळ्या रंगापर्यंतचा भाग परावर्तित करणाऱ्या सापळ्याकडे मधमाश्या आकर्षित होतात. ओस्ट्रोव्हेरखोवा यांनी केलेल्या प्रयोगामध्ये मिळालेल्या निष्कर्षानुसार खास निळ्या चमकदार रंगाचे (तरंगलांबी ४२० ते ४८० नॅनोमीटर) आणि हिरव्या रंगाचे (तरंगलांबी ५१० ते ५४० नॅनोमीटर) प्रक्षेपण करणारे सापळे तयार केले. त्यातील निळ्या रंगाच्या तुलनेमध्ये हिरव्या रंगाच्या सापळ्याकडे मधमाश्या कमी आकर्षित होत असल्याचे आढळले. निळ्या रंगामध्ये ४०० ते ४२० नॅनोमीटर तरंगलांबीपेक्षा ४३० ते ४८० नॅनोमीटर या टप्प्यातील चमकदार प्रकाश आकर्षित करत असल्याचे दिसून आले. हे संशोधन जर्नल ऑफ कंपॅरिटिव्ह फिजिऑलॉजी या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...