agricultural stories in marathi, agro vision, Bees understand the concept of zero | Agrowon

मधमाश्यांना समजते शून्याची संकल्पना
वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

माणसांच्या आधुनिक विज्ञानाच्या शोधामध्ये शून्याचा शोध महत्त्वाचा मानला जातो. अन्य सजीवांमध्ये शून्य समजणाऱ्या प्राण्यांचा एक वर्ग अधिक हुशार असल्याचे मानले जाते. या वर्गामध्ये आता मधमाश्‍यांची गणना करावी लागेल. मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथील आरएमआयटी विद्यापीठातील ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच संशोधकांना मधमाश्‍यांना शून्याची संकल्पना समजत असल्याचे आढळले आहे. हे संशोधन ‘सायन्स’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

माणसांच्या आधुनिक विज्ञानाच्या शोधामध्ये शून्याचा शोध महत्त्वाचा मानला जातो. अन्य सजीवांमध्ये शून्य समजणाऱ्या प्राण्यांचा एक वर्ग अधिक हुशार असल्याचे मानले जाते. या वर्गामध्ये आता मधमाश्‍यांची गणना करावी लागेल. मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथील आरएमआयटी विद्यापीठातील ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच संशोधकांना मधमाश्‍यांना शून्याची संकल्पना समजत असल्याचे आढळले आहे. हे संशोधन ‘सायन्स’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

शून्याची कल्पना अत्यंत गुंतागुंतीची असून, तिचे कोणतेही भौतिक अस्तित्व नसते. त्यामुळे अत्यंत लहान मेंदू असलेल्या मधमाश्‍यांमधील या क्षमतांचा अभ्यास करण्यासाठी खास प्रयोग करण्यात आले. कमी कमी होत जाणाऱ्या अंकामध्ये शून्याची कल्पना काहीही नसण्याच्या स्वरूपामध्ये येते. सहयोगी प्रा. अॅन्ड्रेयन डायर यांनी सांगितले, की शून्यांची कल्पना ही अत्यंत अवघड असून, तितके गणिती कौशल्य लहान मुलांमध्ये येण्यासाठीही काही वर्षे लागतात. त्यामुळे दीर्घकाळ केवळ माणसांमध्येच ही क्षमता असल्याचे मानले जात होते. मात्र, नव्याने झालेल्या संशोधनामध्ये माकडे आणि पक्ष्यांमध्येही कल्पना समजू शकत असल्याचे लक्षात आले. कीटकांमध्ये प्रथमच मधमाश्यांत ही कल्पना शिकण्याची क्षमता दिसून आली. मधमाश्या अन्य मधमाश्यांकडून विविध कल्पना शिकत असतात. मात्र, सारखेपणा आणि फरक या सारख्या संकल्पनाही त्यांना कळत असल्याचे पूर्वी झालेल्या संशोधनात आढळले आहे.

माणसांच्या मेंदूमध्ये ८६००० दशलक्ष न्युरॉन्स असतात, त्याच वेळी मधमाश्यांच्या मेंदूंमध्ये केवळ १० लाखांपेक्षा कमी न्युरॉन्स असतात. असे असताना मधमाश्‍यांमध्ये असलेल्या या क्षमतेमुळे संशोधनाची अनेक नवी कवाडे उघडी होण्यास मदत होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...