टोमॅटो विक्रीसाठी बेल्जियमच्या शेतकऱ्यांची नावीन्यपूर्ण कल्पना

टोमॅटो विक्रीसाठी बेल्जियमच्या शेतकऱ्यांची नावीन्यपूर्ण कल्पना

बेल्जियम येथील टोमॅटो उत्पादक स्टॉफेल्स टोमॅटेन यांनी गेल्या काही वर्षांमध्ये टोमॅटो बाजारपेठेमध्ये प्रभाव टाकण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या आहेत. या वर्षीही कच्चे, ताजे खाण्यायोग्य टोमॅटो जात टोमाम्युज लागवड करून बाजारात आणली आहे. तिच्या विक्रीसाठी अॅटोमाटा या स्वयंचलित वाहनाचा वापर केला आहे. त्यातून टोमॅटो स्नॅक्सच्या स्वरुपामध्ये खाण्यासाठी प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कृत्रिम प्रकाशामध्ये हरितगृहात घेतलेले टोमॅटो बाजारात येण्याचे प्रमाण कमी होते. नैसर्गिक प्रकाशातील टोमॅटो बाजारात येऊ लागतात. या आठवड्यामध्ये बेल्जियम येथील रिज्केवूरसेल येथील हरितगृहातील नैसर्गिक प्रकाशातील टोमॅटो बाजारात आले. एक एप्रिलपर्यंत बाजारातील सर्व टोमॅटो नैसर्गिक प्रकाशातील असतात. हिवाळी महिने चांगले गेले असून, आम्ही विक्रीबाबत समाधानी आहोत. अर्थात, प्रतिदिन होणाऱ्या टोमॅटोच्या उलाढालीपेक्षाही कायमस्वरूपी ग्राहक आमच्याकडे असल्याने दिवसाच्या बाजारावरील आमचे अवलंबित्व कमी आहे. ग्राहकांची कृत्रिम प्रकाशातील नेदरलँड किंवा बेल्यियम येथील टोमॅटो उत्पादनाला विशेष मागणी असते. उत्तर युरोपातील उत्पादनाला काही स्पॅनिश उत्पादनाची काही प्रमाणात जोड होते. स्टॉफेल्स टोमॅटेन यांचे स्वतःचे टोमॅटो उत्पादन हे प्रामुख्याने ३० हेक्टर क्षेत्रावर असते. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्र हे कृत्रिम प्रकाशाखाली आहे. त्यात वाढ करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामुळे वर्षभर टोमॅटोचे उत्पादन घेणे शक्य होईल. ग्राहकांना वर्षभर टोमॅटो पुरवणेही शक्य होणार आहे. रिज्केवूरसेल येथील अन्य शेतकऱ्यांसह एकत्रित विक्री व्यवस्था अन्य कामे ते करतात.

स्वआकांशानुसार निवड ः पेट्रा वेल्डमॅन यांचीही कंपनी असून, ते टोमॅटोचे उत्पादन घेतात. ते म्हणाले, की केवळ बाजाराच्या मागणीनुसार हेलकावे खात राहण्यापेक्षा नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर करण्याची गरज वाढत आहे. बाजाराची मागणी ही अधिक खर्चिक आणि दीर्घकालीन परीक्षा घेणारी असल्याचे भूतकाळातील अनुभव आहेत. दरवेळी त्यात यश मिळेलच असे नाही. त्यांच्या कंपनीने टोमॅटो बाजारामध्ये नव्या कल्पना आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला सेल्फ विल्ड चॉईसेस (स्वआकांशानुसार निवड) असे नाव दिले आहे. स्नॅक्स म्हणून कच्चे खाण्यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार टोमॅटोच्या स्वादावर, गोडीवर (ब्रिक्स पातळीवर) लक्ष केंद्रीत केले आहे. पॉल आणि पेट्रा यांच्याकडे गोडी कमी असलेल्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या टोमॅटोच्या जातींचे प्रात्यक्षिक प्लॉटही आहेत. स्नॅक्स टोमॅटो ः सुमारे दहा टोमॅटो जाती बाजारात एकाच कोपऱ्यात उपलब्ध असतात. त्यांच्यामध्ये बाजारदराची स्पर्धाही असते. अशावेळी त्यातील वेगळेपण तुम्हालाच सांगावे लागते. उदा. लाल रंगाचे अधिक गोड असलेले खाण्यायोग्य टोमॅटो हे एक उदाहरण आहे. पॉल यांनी सांगितले, की विक्रीच्या नव्या कल्पना राबवण्यासाठी वेळ आणि पैशांची गरज असते. त्याचप्रमाणे गुंतवणुकीचे धाडस असावे लागते. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून टोमॅम्युज तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा कुठे या वर्षी बाजारात आमचे अस्तित्व दिसत आहे. पंधरा वर्षांपूर्वी नव्या जाती बाजारात आणणे तुलनेने सोपे होते. औषधी स्वाद, गडद बर्गंडी रंग आणि वेगवेगळे आकार यामुळे टोमॅम्युज ही टोमॅटो जात पुढे येत आहे. सध्या पाच उत्पादक त्याचे उत्पादन घेत आहेत.

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com