जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत
ताज्या घडामोडी
उत्तर अमेरिकेमध्ये वाढणाऱ्या स्वीचग्रास या अखाद्य गवतापासून तयार करणाऱ्यात आलेल्या जैवइंधनामुळे प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यामध्ये मोलाची मदत होऊ शकत असल्याचे संशोधन कोलोरॅडो राज्य विद्यापीठामध्ये करण्यात आले आहे.
उत्तर अमेरिकेमध्ये वाढणाऱ्या स्वीचग्रास या अखाद्य गवतापासून तयार करणाऱ्यात आलेल्या जैवइंधनामुळे प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यामध्ये मोलाची मदत होऊ शकत असल्याचे संशोधन कोलोरॅडो राज्य विद्यापीठामध्ये करण्यात आले आहे.
हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे हवामानावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यावर मात करण्यासाठी संशोधक, शासकीय संस्था आणि कंपन्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. वाहनामध्ये (विमानांसह सर्व ) वापरल्या जाणाऱ्या खनिज इंधनाच्या ज्वलनातून प्रदूषणकारक वायू तयार होतात. त्यावर मात करण्यासाठी जैवइंधनाच्या निर्मितीसाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, जैवइंधनासाठी मक्याची वेगाने वाढत असलेली लागवड ही अंतिमतः पर्यावरणासाठी धोक्याची ठरू शकते. जैवइंधनाच्या निर्मितीसाठी स्वीचग्राससारख्या वेगाने वाढणाऱ्या अखाद्य वनस्पती फायद्याच्या ठरू शकत असल्याचे कोलोरॅडो राज्य विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. इथेनॉल निर्मितीसाठी तंत्रज्ञान आणि पर्यावरणावरील परिणामाचे निष्कर्ष ‘नेचर एनर्जी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
नॅचरल रिसोर्स लॅबमधील संशोधक जॉन फिल्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कान्सास येथील प्रक्षेत्रावर दुसऱ्या पिढीतील जैवइंधन निर्मितीसाठी योग्य पिकांच्या निवडीसाठी संशोधन केले आहे. संशोधकांनी डेसेंट या इकोसिस्टिम मॉडेलिंग साधनाद्वारे कार्बन साखळीचा सातत्याने मागोवा घेतला. त्यात पिकाच्या वाढीपासून हवामानाला दिला जाणारा प्रतिसाद यांचाही समावेश होता. त्यात वनस्पतीतील तारांप्रमाणे असलेल्या फायबर (सेल्युलोज)वर लक्ष केंद्रित केले. अखाद्य गवते ही खते व सिंचनाशिवायही वेगाने वाढतात. ती मक्याप्रमाणे शेतामध्ये पिकविण्याची आवश्यकता नाही. या वनस्पती बहुवर्षायू असल्याने दरवर्षी लागवडीची आवश्यकता नाही. परिणामी त्यांचा पर्यावरणावर पडणारा ताण हा मक्याच्या तुलनेमध्ये कमी असणार आहे. या वनस्पतीच्या वाढीसाठी हवामानावर पडणारा ताण (क्लायमेट फूटप्रिंट) हा वजा ११ ते १० ग्रॅम कार्बन डाय ऑक्साईढ प्रति मेगाज्युल असल्याचे विविध अभ्यासामध्ये दिसून आले. अन्य गॅसोलीनसारख्या इंधनामुळे हे प्रमाण ९४ ग्रॅम कार्बन डायऑक्साईड प्रति मेगाज्युल इतके आहे.
जैवइंधन उद्योगासमोरील अडचणी
सध्या खनिज इंधनाच्या किमती नीचतम पातळीवर आहेत. तुलनेने जैवइंधनाच्या निर्मितीचा खर्च अधिक आहे. परिणामी, जैवइंधनामध्ये पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जा या सारख्या अन्य अपारंपरिक ऊर्जा स्रोतांप्रमाणे अनेक क्षमता असल्या तरी जैवइंधनावरील संशोधनासाठी आर्थिक निधीची उपलब्धता कमी होत आहे. मात्र, खनिज इंधनेही माणसाला तयार करता येत नाहीत. एकदा उपलब्ध साठा संपल्यानंतर जैवइंधनाशिवाय माणसांला पर्याय असणार नसल्याचे मत फिल्ड यांनी व्यक्त केले.
- 1 of 348
- ››