अनुभवावर ठरतो मधमाश्यांचा फुलांपर्यंतचा मार्ग

अनुभवावर ठरतो मधमाश्यांचा फुलांपर्यंतचा मार्ग
अनुभवावर ठरतो मधमाश्यांचा फुलांपर्यंतचा मार्ग

अनुभवाने शहाणपणा वाढते, ही बाब माणसांइतकीच मधमाश्यांमध्येही खरी आहे. मधमाश्याही आपल्या अनुभवातून फुलांना भेटी देण्याचा क्रम आणि मार्ग ठरवत असल्याचे लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. मधमाश्यांच्या मार्गामध्ये अनुभवानुसार सातत्याने सुधारणा होत असल्याचे संशोधकांचे मत आहे. दोन फुलांमध्ये कमी अंतराचा मार्ग घेण्याचे विविध प्रलोभने असतानाही मधमाश्या जास्त अंतर कापावे लागण्याचा धोका पत्करत असल्याचेही त्यांना दिसून आले. वसाहत किंवा घरट्यापासून आपल्या खाद्याचे नेमके अंतर कोणत्याही प्राणी, पक्षी किंवा माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. कारण रोजचे खाद्य मिळविण्यासाठीची त्यांची धडपड त्यावर ठरत असते. एकाच वेळी अधिक ठिकाणी खाद्य उपलब्ध असतानाही योग्य निर्णय घेण्याचे दडपण प्रत्येकावर असते. त्यामध्ये खाद्याचे प्रमाण, दर्जा आणि अंतर असे अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. रॉथमस्टेट रिसर्च या संस्थेच्या सहकार्याने क्वीन मेरी विद्यापीठातील संशोधकांनी हार्मोनिक रडार आणि कृत्रिम फुलांच्या साह्याने बंबल बी माश्यांवर प्रयोग केले. वसाहतीपासून मधमाश्यांच्या फेऱ्या व त्यातील बदलांचा वेध घेण्यात आला. त्याचे निष्कर्ष ‘सायंटिफ रिपोर्टस’मध्ये प्रकाशित करण्यात आले. माणसांसारखे त्यांच्याकडे कोणतेही नकाशे उपलब्ध नसल्याने संपूर्ण नैसर्गिक क्षमतेवर अवलंबून हे निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी त्या आपल्या अनुभवावर अवलंबून राहत असल्याचे क्वीन मेरी विद्यापीठातील जैव आणि रसायनशास्त्र महाविद्यालयातील संशोधक जोसेफ वुडगेट यांनी सांगितले. एकाच दिवसामध्ये अनेक भेटी द्याव्या लागणाऱ्या विक्री प्रतिनिधींची धावपळ डोळ्यांसमोर आणल्यास मधमाश्यांची धावपळ आपल्या लक्षात येईल. असेच एक आव्हान प्रयोगामध्ये मधमाश्यांच्या समोर ठेवण्यात आले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मधमाश्यांच्या उड्डाणांचा प्रचंड माहितीसाठा गोळा केला. त्यातून अनुभवातून मार्गामध्ये मधमाश्यांनी केलेल्या सुधारणा, त्यांची लवचिकता, वेगळा किंवा अधिक दूरवरचा मार्ग स्वीकारण्याचे धाडस, अशा अनेक बाबी प्रथमच पुढे आल्या. - प्रो. लार्स चिट्टका, संशोधन समन्वयक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com