agricultural stories in marathi, agro vision, California's heavy rain highlights benefits of hydroponic strawberries | Agrowon

तीव्र पावसाचा हायड्रोपोनिक्स स्ट्रॉबेरीला बसला कमी फटका
वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

कॅलिफोर्नियातील अवकाळी आलेल्या तीव्र पावसाचा फटका स्ट्रॉबेरी पिकाला बसला आहे. ज्यांच्याकडे हरितगृह आणि हायड्रोपोनिक्स पद्धतींचा अवलंब होता त्यांना काही प्रमाणात आलेल्या पावसाचा फायदा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भांडवली गुंतवणूक अधिक असलेल्या आधुनिक पद्धतीचा अवलंब एकूण पिकाच्या उत्पादन वाढ आणि दर्जेदारपणा यासाठी उपयुक्त ठरल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले.

कॅलिफोर्नियातील अवकाळी आलेल्या तीव्र पावसाचा फटका स्ट्रॉबेरी पिकाला बसला आहे. ज्यांच्याकडे हरितगृह आणि हायड्रोपोनिक्स पद्धतींचा अवलंब होता त्यांना काही प्रमाणात आलेल्या पावसाचा फायदा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भांडवली गुंतवणूक अधिक असलेल्या आधुनिक पद्धतीचा अवलंब एकूण पिकाच्या उत्पादन वाढ आणि दर्जेदारपणा यासाठी उपयुक्त ठरल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून कॅलिफोर्नियामध्ये पाऊस होत आहे. हिवाळ्यातील कोरड्या वातावरणाकडून ओल्या वसंताकडे वातावरणातील बदल निर्देश करत आहेत. या वातावरणाचा सर्वाधिक फटका नाजूक असलेल्या स्ट्रॉबेरी पिकाला बसतो. त्याविषयी माहिती देताना शेतकरी डेव्ह अकाहोशी यांनी सांगितले, की पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादन हाती येण्यासाठी उशीर होणार आहे. सॅण्टा मारिया भागामध्ये साधारणतः वसंत ऋतू चांगला असतो. येथे उन्हाळ्यात काही प्रमाणात उशीर होतो. या वर्षीही एप्रिलपर्यंत स्ट्रॉबेरीचे लक्षणीय उत्पादन हाती येण्याची शक्यता दिसत नाही. वॅटव्हिले भागही उत्पादनामध्ये मागे आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे करपा आणि अन्य रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे.

पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर हायड्रोपोनिक्स पद्धतीने स्ट्रॉबेरी उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांकडे चांगले व दर्जेदार उत्पादन मिळण्याची शक्यता दिसत आहे. यातील अनेक शेतकऱ्यांकडे हरितगृहासारख्या पीक संरक्षणाची सोय आहे. अशास्थितीत तुलनेने थंड व आर्द्रतापूर्ण वातावरणामध्ये स्ट्रॉबेरी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता हे उत्पादक व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्याचे प्रातिनिधिक उदाहरण ः
डेव्ह अकाहोशी यांच्याकडे ४० एकर क्षेत्रावर हायड्रोपोनिक्स आणि हरितगृहामध्ये स्ट्रॉबेरी पीक आहे. हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये सुरवातीला भांडवली गुंतवणूक अधिक असली तरी एकूण पिकांचे उत्पादन व सुरक्षितता पाहता उपयुक्तता अधिक असल्याचे दिसून आले. अवकाळी पावसामुळे शेतीमध्ये स्वच्छता ठेवण्यामध्ये अडचणी येतात. त्यावर या पद्धतीने मात करत आली. फळे चांगली मिळू शकतात. अकाहोशी यांनी सांगितले, की लागवड पद्धतींची तुलना करण्यासाठी सध्याची परिस्थिती चांगली आहे. पावसामुळे स्ट्रॉबेरीवरील परिणाम आधुनिक हायट्रोपोनिक्स पद्धतीमुळे तुलनेने कमी झाले. स्ट्रॉबेरी उत्पादनामध्ये व गोडीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते आहे. नेहमी वसंतामध्ये अनुभवायला येणाऱ्या स्थितीमुळे टनेल (हरितगृह) मधील पिकांच्या वाढीची स्थिती चांगली आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...