agricultural stories in marathi, agro vision, California's water saving brings bonus effects | Agrowon

पाणीबचतीमुळे मिळाला पर्यावरणासाठीही बोनस !
वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

कॅलिफोर्नियामध्ये पाणी वाचवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फायदा पर्यावरणासाठीही होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये घट, विजेच्या वापरामध्ये बचत साध्य झाली आहे. कर्बवायूंच्या उत्सर्जनाचा विचार केला असता पाणीबचतीच्या फायद्यासह पर्यावरणासाठी बोनसच मिळाला. डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात झालेल्या या संशोधनांचे निष्कर्ष ‘जर्नल एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्स’मध्ये प्रकाशित झाले आहेत.

कॅलिफोर्नियामध्ये पाणी वाचवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फायदा पर्यावरणासाठीही होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये घट, विजेच्या वापरामध्ये बचत साध्य झाली आहे. कर्बवायूंच्या उत्सर्जनाचा विचार केला असता पाणीबचतीच्या फायद्यासह पर्यावरणासाठी बोनसच मिळाला. डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात झालेल्या या संशोधनांचे निष्कर्ष ‘जर्नल एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्स’मध्ये प्रकाशित झाले आहेत.

सुमारे चार वर्षेे कॅलिफोर्निया राज्याला सतत दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत होता. या काळात ५.४२ लाख हेक्टर क्षेत्र पडिक राहिल्याने २,७२ अब्ज डॉलरइतके आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. परिणामी २१ हजार नोकऱ्याही कमी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर २०१५ मध्ये कॅलिफोर्निया राज्यामध्ये पाणीवापरामध्ये २५ टक्क्यांपर्यंत बचत करण्याचे धोरण राबवण्यात आले. त्यातून सुमारे ५२.४ लाख गॅलन पाणी वाचले.

  • पाणी आणि ऊर्जावापर यांचा जवळचा संबंध असतो. त्याविषयी माहिती देताना डॉ. एडवर्ड स्पॅंग म्हणाले, की उत्तरेतील तुलनेने अधिक पाणी असलेल्या प्रदेशातून दक्षिणेकडे पाणी वाहतुकीसाठी व शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. यासाठी एकूण वीजवापराच्या सुमारे १९ टक्के, तर नैसर्गिक वायूच्या ३२ टक्के मागणी होत असते.
  • पाणीबचतीच्या उपाययोजनांमुळे विजेच्या वापरामध्ये १८३० गीगावॉट तास बचत झाली.
  • हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्येही घट झाली. या राज्यामधील ५.२४ लाख टन कार्बन डायऑक्साईड इक्विव्हॅलंट उत्सर्जन कमी झाले. हे प्रमाण एका वर्षामध्ये १.११ लाख कार रस्त्यावर चालवण्यानंतर उत्सर्जित होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाइतके मोठे आहे.
  • पाणीबचतीसाठी केलेल्या खर्चाची तुलना या सर्व फायद्याशी केली असता हे सर्व फायदे पुढे आले.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...