मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन संस्कृतींचे अस्त

मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन संस्कृतींचे अस्त
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन संस्कृतींचे अस्त

महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा ऱ्हास हे कोणत्याही युद्ध किंवा आपत्तीमुळे होण्यापेक्षाही अधिक मातीची सुपीकता घटत गेल्यामुळे झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. मातीची सुपीकता पर्यायाने पिकांचे उत्पादन घटत गेल्याने अनेक प्राचीन संस्कृतीतील बहुसंख्य लोकांना स्थलांतर करावे लागले. भविष्यामध्येही हा धोका लक्षात घेण्याची आवश्यकता जगभरातील मृदा संशोधक व्यक्त करत आहेत. विट्स विद्यापीठातील प्रा. मेरी स्कोल्स आणि डॉ. बॉब स्कोल्स यांनी केलेल्या अभ्यासात जमिनीची सुपीकता पर्यायाने उत्पादकता वेगाने घटण्यामागे मातीची धूप, क्षारांचे वाढते प्रमाण आणि अन्नद्रव्यांची कमतरता ही तीन कारणे असल्याचे आढळले आहे. शेतीमध्ये सातत्याने लागवडीखाली असलेल्या जमिनीमध्ये जिवाणूंचे प्रमाण वेगाने कमी होत असून, हे जिवाणू जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे रूपांतर अन्नद्रव्यामध्ये करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावतात. याबाबतच संशोधन जर्नल सॉईल सायन्समध्ये प्रकाशित केले होते. रासायनिक खते, सिंचनाच्या पद्धती आणि नांगरणीसाठी मोठी यंत्रे यांचा वापर वेगाने वाढत गेला आहे. परिणामी, प्रतिवर्ष लागवडीखालील जागतिक क्षेत्राच्या सुमारे एक टक्के जमिनीचा ऱ्हास होत आहे. आफ्रिकेमध्ये जंगलाखालील क्षेत्र कमी होत असून, तिथे जमिनीच्या होणारी धूप होऊन अन्नद्रव्यांचे प्रमाण घटले आहे. उत्पादकतेमध्ये ८ टक्केने घट झाल्याचे नोंदवले गेले आहे. या विषयी माहिती देताना बॉब स्कोल्स यांनी सांगितले, की जमिनीची सुपीकता हा जैवभौतिक आणि सामाजिक गुणधर्म आहे. सामाजिक असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संपूर्ण मनुष्यजातच नव्हे, तर त्यांचे पाळीव प्राणीही या उपजिविकेसाठी जमिनीवर अवलंबून असतात. प्राचीन काळी जमिनीच्या सुपीकतेसंदर्भात शेतकरी दमलेली, आजारी किंवा थंड पडलेली माती अशा प्रकारे वर्णन करत. या समस्यांवर त्याकाळी उत्तर नव्हते. त्यामुळे हे क्षेत्र सोडून अन्य जंगलाखालील क्षेत्र लागवडीखाली आणले जाई. काही पडीक ठेवल्यानंतर पुन्हा पूर्वीच्या जमिनीमध्ये लागवडीचा प्रयत्न करत. मात्र, विसाव्या शतकाच्या मध्यावर मातीतील कमतरताविषयी माहिती होऊ लागली. त्याची पूर्तता करण्यासाठी कृषी रसायन उद्योग वाढत गेला. - अन्नद्रव्यांची पूर्तता करून उत्पादकता वाढीसाठी वेगाने प्रयत्न सुरू झाले. मात्र, त्यामध्ये जागतिक तापमान वाढ, जलस्रोत, नद्या, तलाव यांतील नत्र, स्फुरदयुक्त खतांचे प्रदूषण वाढत गेले. आज एकूण हरितगृह वायूंच्या निर्मितीतील अर्ध्यापेक्षा अधिक हिस्सा हा मातीतून झालेल्या उत्सर्जनातून येतो.

  • सातत्याने बाह्य रसायनांवर अवलंबून राहावे लागल्याने शेती ही कृषी रसायन उद्योगांचा आहारी गेली. फायद्याचे प्रमाण कमी झाले.
  • केवळ सेंद्रिय पद्धतीने उत्पादनावर जागतिक लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षितता मिळवणे शक्य नसल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादनासाठी अधिक क्षेत्र लागवडीखाली आणण्याची आवश्यकता निर्माण होईल. वास्तविक पाहता तेवढे क्षेत्र उपलब्ध नाही.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com