झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत अयोग्य मातीचाही अडथळा

झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत अयोग्य मातीचाही अडथळा
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत अयोग्य मातीचाही अडथळा

तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे होणारी झाडांची वाटचाल अयोग्य जमिनीमुळे रोखली जाण्याची शक्यता गुयेल्फ विद्यापीठातील संशोधकांच्या प्रयोगातून पुढे आली आहे. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हवामानातील बदलामुळे अधिक उंचावरील आणि उत्तरेकडील प्रदेशामधील तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता संशोधकांकडून व्यक्त केली जाते. या ठिकाणी झाडांची वाढ शक्य होण्यासाठी योग्य ते गुणधर्म मातीत असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कॅनाडियन रॉकीज या पर्वतीय प्रदेशातील वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास गुयेल्फ विद्यापीठातील संशोधिका इम्मा डेव्हिस व प्रो. झीव्ह गेडॉल्फ करीत आहेत. त्यांनी विविध उंचीवर स्प्रुस आणि फर झाडांच्या रोपांची वाढ करून चाचण्या घेत आहेत. या ठिकाणचे मातीचे नमुने गोळा करून त्यात वाढ कक्षामध्ये स्प्रुस रोपांची वाढ केली जात आहे. बदलत्या वातावरणामुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. सामान्यतः संवर्धक संशोधक एकेक प्रजातीचे जतन किंवा संपूर्ण पर्यावरण प्रणालीचे जतन, अशा दोन पर्यायांवर काम करतात. गुयेल्फ विद्यापीठातील संशोधिका इम्मा डेव्हिस यांनी प्रो. झीव्ह गेडॉल्फ यांच्यासह केलेल्या पहिल्या अभ्यासामध्ये नैऋत्य कॅनडातील मातीच्या गुणधर्माचे झाडांच्या वाढीवर होणारे परीणाम तपासले. झाडांच्या ओळी अधिक उंचीकडे सरकत असल्याचा अंदाज व्यक्त केला. दर १३० किमी अंतर उत्तरेकडे सरकत गेल्यास तापमानामध्ये एक अंश सेल्सिअसने घट होते. हे प्रमाण पर्वतावर ६५ ते १०० मीटर उंचीकडे सरकरण्याएवढे आहे. भविष्यामध्ये वाढणाऱ्या तापमानामध्ये अल्पीन झाडे अधिक उंचीकडे सरकण्याचा अंदाज यातून काढता येतो. त्याविषयी माहिती देताना इम्मा डेव्हिस यांनी सांगितले, की सामान्यतः हवामानातील बदलाकडे पाहण्याचा एक औपचारिक दृष्टीकोन असतो. मात्र, यात माणसांच्या समजापलीकडेही अनेक बाबी अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com