तापमानवाढीमुळे अनेक वनस्पती होतील नष्ट

तापमानवाढीमुळे अनेक वनस्पती होतील नष्ट
तापमानवाढीमुळे अनेक वनस्पती होतील नष्ट

वातावरण उष्ण होत असल्याचा फटका अनेक वनस्पती प्रजातींना बसत असल्यासंदर्भातील पुरावा कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधकांना मिळाला आहे. पर्वतीय कातळामध्ये वाढणारी व फुले येणारी एक वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दीर्घकालीन प्रयोगात दिसून आले. हे संशोधन जर्नल सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. बाऊल्डर (अमेरिका) येथील कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधनामध्ये वातावरणातील वाढती उष्णता आणि स्थानिक वनस्पती नष्ट होण्यातील संबंध जोडण्यात आला आहे. पर्वतीय दगडांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या वनस्पतीला तिच्या मोगऱ्याप्रमाणे दिसणाऱ्या फुलांमुळे नॉर्थन रॉक जॅस्मिन (शा. नाव ः Androsace septentrionalis) म्हणून ओळखले जाते. ही वनस्पती एल्बर्ट पर्वतांवर ६ ते १४ हजार फूट उंचीवर आढळते. या संशोधनाविषयी माहिती देताना संशोधक अॅनी मारी पॅनेट्टा यांनी सांगितले, की वनस्पतींच्या संख्येविषयी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीवरून तापमानातील बदलांच्या परिणामांचा अंदाज लावण्यात येत असला, तरी त्याच्या नेमक्या कारणांविषयी स्पष्ट पुरावे उपलब्ध नव्हते. आमच्या संशोधनामध्ये त्यामागील यंत्रणांचा शोध घेण्यात यश आले आहे. दीर्घकालीन प्रयोगाचे निष्कर्ष ः

  • गन्निसन (कोलोरॅडो) येथील रॉकी माउंटन बायोलॉजिकल लॅबोरेटरीद्वारे गेल्या २५ वर्षांपासून या विषयावर संशोधन करण्यात येत आहे. १९९१ पासून वॉर्मिंग मिड्यू येथे अवरक्त किपणांच्या साह्याने कृत्रिमरीत्या तापमान वाढवून वर्षभर चाचण्या घेण्यात येत आहेत. इतक्या दीर्घकाळापासून सुरू असलेला हा एकमेव उष्णतावाढीविषयीचा प्रयोग आहे.
  • या प्रयोगात मातीचे सरासरी तापमान तीन अंश फॅरनहीटने वाढविले असून, त्यामुळे मातीतील ओलाव्याचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले. त्याच प्रमाणे वसंतामध्ये बर्फाचे वितळणेही एक महिन्यापर्यंत अलीकडे आले.
  • हे तापमान आणि कोरडे वातावरण वास्तवदर्शी नसले, तरी येत्या ५० ते १०० वर्षांनंतरच्या अंदाजाप्रमाणे ठेवण्यात आल्याचे पॅनेट्टा यांनी सांगितले.
  • या प्रयोग प्रक्षेत्रामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या A. septentrionalis या फुले येणाऱ्या वनस्पतीवरील परिणामांची निरीक्षणे घेण्यात आली.
  • त्यात त्याच्या बियांची निर्मिती, सध्या असलेल्या रोपांची पुनरुत्पादन वय लक्षणीयरीत्या कमी झाले. त्यामुळे त्यांची संख्या वेगाने शून्यापर्यंत पोचली.
  • वनस्पतीच्या वाढीच्या विविध अवस्थांवर विपरीत परिणाम दिसून आले. या प्रयोगातून वाढत्या उष्णतेमध्ये निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करणे हे आव्हानात्मक असल्याचे स्पष्ट होत आहे.
  • सुरवातीला वनस्पतीची जुळवून घेण्याची क्षमता (किंवा उत्क्रांतीच्या प्रक्रिया) यामुळे वनस्पती वाचू शकेल किंवा बियांच्या विविध ठिकाणी होणाऱ्या प्रसारानेही ती वाचू शकेल असे वाटत होते. मात्र प्रयोगामध्ये ही वनस्पती वेगाने नष्ट होणार असल्याचे दिसून आले. - अॅनी मारी पॅनेट्टा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com