agricultural stories in marathi, agro vision, cool roof save irrigation water | Agrowon

फिकट रंगामुळे छताच्या थंडाव्यासोबत पाण्यात बचतही शक्य
वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

उष्ण कटिबंधामध्ये घराचे तापमान थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूचे विपरीत परिणाम पर्यावरणावरही होतात. याऐवजी छताचा रंग पांढरा किंवा फिकट ठेवल्यास थंड छत ठेवण्यास फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शहरी भागातील लागणाऱ्या पाण्यामध्येही बचत होण्यास मदत होत असल्याचे ‘लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी’ने केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे.

उष्ण कटिबंधामध्ये घराचे तापमान थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूचे विपरीत परिणाम पर्यावरणावरही होतात. याऐवजी छताचा रंग पांढरा किंवा फिकट ठेवल्यास थंड छत ठेवण्यास फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शहरी भागातील लागणाऱ्या पाण्यामध्येही बचत होण्यास मदत होत असल्याचे ‘लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी’ने केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे.

वातावरण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर होतो. त्यातून हरितगृह वायूंचे प्रमाण वाढून तापमानामध्ये वाढ होत असल्याने एकूण पर्यावरणासाठी नुकसानकारक ठरते. यावर मात करण्यासाठी लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेतील ऊर्जा विभागातील संशोधिका पौया वाहमनी आणि अॅण्ड्र्यू जोन्स यांनी छत थंड ठेवण्यासाठी काही प्रयोग केले. त्यांच्या परिणामांचे विश्लेषण केले. यातून घरे थंड राहण्यासोबतच बाह्य परिसरामध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्येही बाष्पीभवन कमी होऊन बचत होऊ शकत असल्याचे दिसून आले. १८ कॅलिफोर्निया प्रांतामध्ये पाणीबचतीचे हे प्रमाण किमान ९ टक्क्यांपर्यंत असेल. लॉस एन्जेलिस प्रांतामध्ये एकूण ८३० लाख गॅलन पाणी प्रतिदिन वाचू शकते. त्यांच्या अभ्यासाचे हे निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे ः

  • सर्वत्र पांढऱ्या किंवा फिकट रंगाचा वापर केल्यास परिसरातील तापमानामध्ये १ ते दीड अंश सेल्सिअसने घट होते.
  • छत थंड करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळेही पाण्यामध्ये मोठी बचत होऊ शकते. विशेषतः शहरातील बागा, लॉन यांचे व्यवस्थापन कमी पाण्यामध्ये करता येते. हे प्रमाण प्रांतानुसार ४ ते ९ टक्क्या़पर्यंत राहते.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...