agricultural stories in marathi, agro vision, Crop-saving soil tests now at farmers' fingertips | Agrowon

शेतावरच करता येईल मातीतील रोगकारक घटकांची चाचणी
वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

मातीतून पसरणाऱ्या रोगांना अटकाव करण्यासाठी मातीतील रोगकारक घटकांची तपासणी करणे आवश्‍यक असते. या तपासण्या प्रामुख्याने मोठ्या प्रयोगशाळांमध्ये कराव्या लागतात. या खर्चिक आणि वेळखाऊ तपासण्या न करण्याकडेच शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, आता वॉशिंग्टन राज्य विद्यापीठाच्या संशोधनामुळे प्रत्यक्ष शेतामध्येच अचूक, वेगवान तपासणी करणे शक्य होणार आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ व्हिज्युअलाइज्ड एक्सपेरिमेंट्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मातीतून पसरणाऱ्या रोगांना अटकाव करण्यासाठी मातीतील रोगकारक घटकांची तपासणी करणे आवश्‍यक असते. या तपासण्या प्रामुख्याने मोठ्या प्रयोगशाळांमध्ये कराव्या लागतात. या खर्चिक आणि वेळखाऊ तपासण्या न करण्याकडेच शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, आता वॉशिंग्टन राज्य विद्यापीठाच्या संशोधनामुळे प्रत्यक्ष शेतामध्येच अचूक, वेगवान तपासणी करणे शक्य होणार आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ व्हिज्युअलाइज्ड एक्सपेरिमेंट्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रोगकारक घटकांच्या तपासण्यासाठी मोठी, महागडी यंत्रे व उपकरणांची आवश्‍यकता भासत असे. त्यातच या चाचण्यांसाठी काही आठवड्यापर्यंत वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांचाही हिरमोड होई. त्यात ‘पॉलिमराईज चेन रिअऍक्शन’ (पीसीआर ) तत्त्वावर आधारित विश्‍लेषण पद्धती वापरत. ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, संवेदनशील असली तरी केवळ प्रयोगशाळेमध्येच वापरता येई. यावर मात करण्यासाठी वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्रज्ञांनी नवी पद्धती शोधली आहे. ही पद्धती वेगवान असून, सर्वसामान्यांना उपलब्ध असलेल्या घटकांद्वारे राबवता येते. याविषयीची माहिती व उपकरणाची यादी संशोधनामध्ये दिली आहे. दिलेल्या सूचनांनुसार जोडणी करून चाचणी करता येते.

शेतकऱ्यांची गरज जाणण्याची आवश्यकता ः
वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील वनस्पती विकृतीशास्त्र विभागातील सहायक प्रा. किवामू टनाका यांनी सांगितले, की मातीचे नमुने तपासणीसाठी लागणारा वेळ आणि दूरवरच्या प्रयोगशाळा यामुळे शेतकरी माती तपासणीपासून दूर राहतात. काही वेळा हा कालावधी इतका असतो, की त्यावर उपाययोजना करण्याची वेळ निघून गेलेली असते. मात्र, त्याऐवजी प्रत्यक्ष शेतामध्येच तपासणी करणे शक्य झाल्यास शेतीतील विविध निर्णय वेगाने घेणे शक्य होऊ शकते. वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे व्यवस्थापन उत्तम होऊन पिकाची लागवडही करणे शक्य होऊ शकते.
मातीतील रोगकारक घटकामुळे येणारे काही रोग बीजांकुरण झाल्यानंतर काही आठवड्यांपर्यंत दिसूनही येत नाहीत. त्यामुळे त्यावरील उपचारालाही होणारा विलंब टाळता येणे शक्य आहे.

अडचणीवर केली मात ः
पदवीचे विद्यार्थी व संशोधक जोसेफ डेशिल्ड्स यांनी सांगितले, की प्रत्यक्ष शेतामध्ये स्वतःचे उपकरण तयार करण्यासाठी साधारण सहा महिन्यांचा काळ लागतो. मातीतील सूक्ष्मजीवांचे डीएनए पकडण्यासाठी खास चुंबकाचा अवलंब केलेला असतो. खरेतर मातीतून जनुकीय घटक वेगळे व शुद्ध करणे अत्यंत अवघड असते. कारण मातीमध्ये अन्य अनेक जनुकीय घटक असतात. ते पीसीआर चाचणीतही आढळतात. त्यावर मात करण्यासाठी वनस्पती रोगनिदान तज्ज्ञ रॅचेल बॉम्बर्गर यांनी मदत केली. त्यांनी चाचणी यंत्रांची संकल्पना अधिक सुलभ करण्यात मोलाची भूमिका निभावली. बॉम्बर्गर म्हणाल्या, की मातीच्या रोगकारक घटकांसाठी तपासण्या करण्यात येणारी ही प्रमुख अडचण असून, ती दूर करण्यात आम्हाला यश आले आहे. हे सारे अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने करता येते.

मातीतील रोगकारक घटकांचे मॅपिंगही शक्य
टनाका म्हणाले की, पूर्व वॉशिंग्टन येथील बटाट्याच्या शेतामध्ये या प्रणालीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानुसार जगभरातील कोणत्याही मातीमध्ये ते यशस्वी ठरेल, या विश्वास त्यातून आला आहे. त्याची अचूकता उत्तम असल्याने देशभरातील रोगकारक घटकांचे मॅपिंग करणे किंवा वितरण समजण्यासाठीही त्याचा वापर करता येईल. आम्ही छोट्या प्रमाणात सुरू केले असले तरी मातीचे आरोग्य आणि रोग यांच्या तपासणीसाठी त्याचे अनेक उपयोग होऊ शकतील.

 

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...