agricultural stories in marathi, agro vision, DSH-185 - New CGMS-based Safflower Hybrid | Agrowon

करडईची नवीन संकरित जात ‘डीएसएच १८५’ विकसित
वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीन करडईचे नवीन संकरित वाण डीएसएच १८५ विकसित करण्यात आले आहे. ही जात संपूर्ण भारतासाठी शिफारशीत आहे. ही अधिक उत्पादनक्षम जात असून, फ्युजारियम विल्ट रोगासाठी प्रतिकारक आहे.

डीएसएच १८५ या जातीची वैशिष्ट्ये ः

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीन करडईचे नवीन संकरित वाण डीएसएच १८५ विकसित करण्यात आले आहे. ही जात संपूर्ण भारतासाठी शिफारशीत आहे. ही अधिक उत्पादनक्षम जात असून, फ्युजारियम विल्ट रोगासाठी प्रतिकारक आहे.

डीएसएच १८५ या जातीची वैशिष्ट्ये ः

  • डीएसएच १८५ हे वाण ए १३३ (सीजीएमएस लाइन) आणि १७०५ पी २२ (रिस्टोअर लाइन) यांच्या संकरातून नवीन जात विकसित केली आहे. मूळ जंगली प्रजाती Carthamus oxyacantha हा काही घटकांसाठी मूळ स्रोत म्हणून वापरला आहे.
  • सरासरी बियांचे उत्पादन ः कोरडवाहूमध्ये १४.३ क्विंटल प्रतिहेक्टर आणि सिंचनाखाली २१ क्विंटल प्रतिहेक्टर इतके आहे. तुलनेसाठी राष्ट्रीय पातळीवरील सरासरी उत्पादन १७.४ क्विंटल प्रतिहेक्टर आहे.
  • तेलाचे उत्पादन ः कोरडवाहू स्थितीमध्ये ४.१२ क्विंटल प्रतिहेक्टर असून, सिंचनाखाली ते ५.७ क्विंटलइतके आहे. राष्ट्रीय पातळीवरील सरासरी ४.८९ क्विंटल प्रतिहेक्टर आहे.
  • ए१ आणि पीएनबीएस १२ या जातींच्या तुलनेमध्ये ही जात २५ ते ३० टक्के अधिक बिया उत्पादन देते. तर जीएमएस आधारीत राष्ट्रीय संकरित जात एनएआरआय-एच-१५ पेक्षा १५.२ टक्के अधिक उत्पादन देते.
  • बियातील तेलांचे प्रमाण २८ ते २९ टक्के असून, अन्य ए १, पीएनबीएस १२ या जातींपेक्षा २५ ते २८ टक्के अधिक उत्पादन विविध चाचणी प्रक्षेत्रावर मिळाले आहे.
  • ही जात करडईमध्ये प्रामुख्याने येणाऱ्या फ्युजारीयम विल्ट रोगासाठी प्रतिकारक आहे.

राज्यनिहाय चाचण्यांतील उत्पादन ः
ही जात देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड येथील कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
डीएसएच १८५ जातीचे या राज्यातील चाचण्यांचे निष्कर्ष

  • छत्तीसगड - बियांचे उत्पादन (प्रतिहेक्टर) - कोरडवाहू १७ क्विंटल असून, पारंपरिक जात ए१ चे उत्पादन केवळ ५ क्विंटल मिळाले.
  • महाराष्ट्र - सिंचनाखाली उत्पादन (प्रति हेक्टर) २१ क्विंटल असून, ए१ चे उत्पादन १६ क्विंटल मिळाले.
  • तेलंगणा - कोरडवाहू स्थितीमध्ये उत्पादन १० ते १४ क्विंटल प्रतिहेक्टर मिळाले असून, राज्यातील पारंपरिक जात मंजिराचे उत्पादन ४ ते ५ क्विंटल मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...