agricultural stories in marathi, agro vision, DURIAN FRUIT BUSINESS & BATS | Agrowon

धोक्यातील वटवाघळांवरच ड्युरीयन फळउद्योग अवलंबून
वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

ड्युरीयन फळझाडांच्या परागीकरणामध्ये मोलाची भूमिका निभावणाऱ्या वटवाघळांचा शोध नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी घेतला आहे. आग्नेय आशियातील उडते लांडगे (फ्लाइंग फॉक्सेस) या नावाने ओळखली जाणारी ही वटवाघळाची प्रजाती सध्या धोक्यात आहे. त्यामुळे ड्युरीयन फळ उद्योगावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

ड्युरीयन फळझाडांच्या परागीकरणामध्ये मोलाची भूमिका निभावणाऱ्या वटवाघळांचा शोध नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी घेतला आहे. आग्नेय आशियातील उडते लांडगे (फ्लाइंग फॉक्सेस) या नावाने ओळखली जाणारी ही वटवाघळाची प्रजाती सध्या धोक्यात आहे. त्यामुळे ड्युरीयन फळ उद्योगावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

फ्रान्स येथील राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयातील संशोधिका डॉ. शिमा अब्दूल अझीज यांनी मलेशियातील नॉटींगहॅम विद्यापीठाच्या सहकार्याने आग्नेय आशियातील वटवाघळांचा अभ्यास केला आहे. त्यात त्यांना दुर्मिळ प्रजात उडते लांडगे (Pteropus hypomelanus) चे पुरावे मिळाले आहेत. ही वटवाघळाची प्रजाती ड्युरीयन फळांच्या (Durio zibethinus) उत्पादनामध्ये परागीकरणाद्वारे मोलाची भर घालते. या वटवाघळांच्या अस्तित्त्वाचे पुरावे कॅमेरा सापळ्यांच्या साह्याने मिळवण्यात आले आहे. हे संशोधन जर्नल ऑफ इकॉल़ॉजी अॅण्ड इव्हाल्युशनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना डॉ. शिमा यांनी सांगितले, की या पूर्वी ड्युरीयन झाडांच्या परागीकरणासाठी लहान आकारांची वटवाघळे कार्यरत असल्याचे मानले जात असे. फ्लाइंग फॉक्सेस ही वटवाघळे आकाराने मोठी असून, त्यांच्यामुळे फुलांचे नुकसान होत असल्याचा समज होता. मात्र, आमच्या अभ्यासात नेमके उलटे आढळले आहे. फ्लाइंग फॉक्सेस हीच ड्युरीयन झाडांच्या परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

फळांविषयी ...

  • ड्युरीयन फळे ही काटेरी आणि तीव्र गंधाची असली तरी मलेशिया व थायलंडमध्ये अधिक किंमतीला विकली जातात. आग्नेय आशियातील संस्कृतींच्या ठेव्याच्या स्वरुपामध्ये या फळांकडे पाहिले जात असल्याने या फळांना स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये उत्तम दर मिळतो. त्याला येथे फळांचा राजा असेही संबोधले जाते.
  • हे वैशिष्ट्यपूर्ण फळ असून, त्याचे परागीकरण वटवाघळांद्वारे, तर बियांचा प्रसार हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यांद्वारे होतो.
  • या फळझाडांच्या संशोधनासाठी मलेशिया, फ्रान्स, भारत आणि थायलंड येथील संशोधकांचा एक गट कार्यरत आहे.

फ्लाइंग फॉक्स धोक्यात...
वटवाघळाची ही प्रजाती मोठ्या आकाराची असून, त्यांचे मांस हे अस्थमा, दम्यासारख्या विकारामध्ये औषधी मानले जाते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार व विक्री होते. आधीच जंगलांचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांचे संख्या अत्यंत कमी झाली आहे. त्यात फळपिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरीही त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार करतात. या वटवाघळाची नोंद मलेशियातील धोक्यात असलेल्या प्राण्यांमध्ये होते. वास्तविक ही प्रजाती काही फळांच्या परागीकरणामध्ये मोलाची भूमिका निभावत असल्याचे नव्या संशोधनामध्ये पुढे आले आहे.
 

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...