agricultural stories in marathi, agro vision, Early-killed rye shows promise in edamame | Agrowon

मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण नियंत्रणासाठी ठरतात आश्वासक
वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने तणांचे नियंत्रण करणे महागडे ठरते. तणांच्या नियंत्रणासाठी आच्छादन पिके एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्या अनुषंगाने इल्लिनॉईज विद्यापीठातील कृषी शास्त्र महाविद्यालयामध्ये प्रयोग करण्यात आले. त्यात बेबी सोयाबीन पिकामध्ये मोहरीचे आच्छादन पीक घेऊन ते लवकर गाडून टाकल्यास फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने तणांचे नियंत्रण करणे महागडे ठरते. तणांच्या नियंत्रणासाठी आच्छादन पिके एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्या अनुषंगाने इल्लिनॉईज विद्यापीठातील कृषी शास्त्र महाविद्यालयामध्ये प्रयोग करण्यात आले. त्यात बेबी सोयाबीन पिकामध्ये मोहरीचे आच्छादन पीक घेऊन ते लवकर गाडून टाकल्यास फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

भाजीपाला पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या मानली जाते. त्याच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करणेही अनेक वेळा शक्य होत नाही. अशा वेळी पर्यावरणपूरक पर्यायी पद्धतीचा वापर करण्यासंदर्भात इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधक मार्टी विल्यम्स अभ्यास करीत आहेत. त्यांनी सांगितले, की भाजीपाला पिकामध्ये मोहरीवर्गीय आच्छादन पिकांचा अवलंब केल्यास तणांची घनता २० टक्क्याने कमी होत असल्याचे दिसून आले. सुरवातीच्या काळामध्ये वाढणाऱ्या तणांची वाढ ८५ टक्क्यापर्यंत रोखली जाते.
मोठ्या दाण्याच्या व खाण्यायोग्य सोयाबीनला इडॅमम किंवा बेबी सोयाबीन म्हणून ओळखले जाते. त्याची लागवड भाजीपाल्यामध्ये अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये केली जाते. या पिकाच्या उगवणीवर तणाच्या प्रादुर्भावामुळे विपरीत परिणाम होतो. त्यातच जर आच्छादन पिकांचा अवलंब केल्यास कितपत फायदा होईल, याबाबतच संशोधकांमध्ये मतभिन्नता होती. साध्या सोयाबीनच्या तुलनेमध्ये बेबी सोयाबीन हे मातीचा प्रकार आणि उगवणीसाठी संवेदनशील असते. त्यामुळे या पिकांवर विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी तीन वर्षासाठी चाचण्या घेतल्या. इडॅममच्या ११ प्रकाराचा आणि आच्छादन पिकामध्ये मुळा, विंटर कॅनोला, मोहरीवर्गीय पिके यांचा समावेश होता.

  • थंड तापमानामध्ये मुळ्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे लवकर (एप्रिल) आणि उशिरा (मे) लागवडीमध्ये तण नियंत्रणासाठी वाढीच्या विविध टप्प्यावर कॅनोला आणि मोहरी यांचा वापर केला.
  • तणांची वाढ रोखून धरण्यामध्ये आणि बेबी सोयाबीनची उगवण सहजतेने होण्यात मोहरी हे आच्छादन पीक वाढवून लवकर गाडून टाकल्यास उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. अन्य आच्छादन पिके बेबी सोयाबीनच्या उगवणीवर परिणाम करत नसले तरी तणांच्या नियंत्रणामध्ये फारशी उपयुक्त ठरत नाहीत. त्याविषयी विल्यम्स म्हणाले, की मोहरी पिकाची वाढ होऊन लवकर दाबून टाकल्यास, त्याचा पातळ थर जमिनीवर तयार होतो. त्याचा फायदा बियांच्या उगवणीला होत असला तरी तणांची वाढ रोखली जाते. मात्र, फार जाड थर जमिनीवर तयार झाल्यास बेबी सोयाबीनच्या उगवणीवर परीणाम होऊ शकतो. आच्छादन पीक नसण्याच्या स्थितीमध्ये तण नियंत्रणाचा फायदा मिळत नाही.
  • केवळ आच्छादन पिकाच्या लागवडीतून तण नियंत्रणाला मदत होत असली तरी अन्य आंतरमशागतीचा अवलंब करावा. या सर्व पद्धतीमुळे तणांची घनता आणि वाढ कमी होण्यास मदत होते.
  • हे संशोधन ‘वीड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले असून, विल्यम्स यांच्यासह संशोधक म्हणून लॉरा क्रोफोर्ड, सॅम वॉर्टमॅन यांचाही समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...