agricultural stories in marathi, agro vision, Eating leafy greens every day helps your memory, fights cognitive decline | Agrowon

आहारातील पालेभाज्यांमुळे स्मरणशक्तीसाठी फायदा
वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

दररोज पालेभाज्या खाणाऱ्या व्यक्तींची स्मरणशक्ती वाढण्यासाठी फायदा होत असल्याचे शिकागो येथील रश वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. संशोधिका मार्था क्लेअर मॉरीस व सहकाऱ्यांनी केलेल्या या अभ्यासामध्ये ५८ ते ९९ वर्षे वयाच्या (सरासरी ८१) ९६० वृद्धांचा सहभाग होता. दररोज पालेभाज्या खाण्यामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा डिमेन्शिया (विस्मरण विकार) आढळला नाही.

दररोज पालेभाज्या खाणाऱ्या व्यक्तींची स्मरणशक्ती वाढण्यासाठी फायदा होत असल्याचे शिकागो येथील रश वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. संशोधिका मार्था क्लेअर मॉरीस व सहकाऱ्यांनी केलेल्या या अभ्यासामध्ये ५८ ते ९९ वर्षे वयाच्या (सरासरी ८१) ९६० वृद्धांचा सहभाग होता. दररोज पालेभाज्या खाण्यामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा डिमेन्शिया (विस्मरण विकार) आढळला नाही.

शिकागो येथील रश वैद्यकीय महाविद्यालयातील आहार पोषकता विषयातील प्रा. मार्था क्लेअर मॉरीस व सहकाऱ्यांनी आहार विशेषतः पालेभाज्यांच्या वापराचे आरोग्यावरील परिणामांचा अभ्यास केला आहे. त्यांनी सहभागी लोकांकडून प्रश्नावली भरून घेऊन, त्यांच्या खाण्यातील विविध पदार्थांच्या प्रकारानुसार पाच गटांमध्ये विभागण्यात आले होते. त्यातील सर्वाधिक हिरव्या पालेभाज्या खाणाऱ्या गटातील कॅन्डेस बिशप यांनी सांगितले, की कच्च्या भाज्यांचे सॅलड हा माझ्या आहाराचा मुख्य घटक आहे. त्यातही गडद रंगाच्या पाल्यांना मिश्रणामध्ये मी प्राधान्य देते.

पालेभाज्या खाण्यामध्ये सर्वांत वर असणाऱ्या २० टक्के लोक प्रतिदिन सरासरी १.३ वेळा पालेभाज्या खातात, तर सर्वांत खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्ती अत्यंत कमी किंवा शून्य पालेभाज्या खातात. या पाचही गटातील लोकांच्या आरोग्यावर सलग पाच वर्षे लक्ष ठेवण्यात आले. त्यातील पालेभाज्या सर्वाधिक खाणाऱ्या व्यक्तींचा मेंदू अधिक कार्यरत राहिला. विस्मरणासारख्या विकारांवर मात करणे शक्य झाल्याचे आढळले. अर्थात, पालेभाज्यातील हरितद्रव्य मेंदूच्या आरोग्यासाठी कारणीभूत होते असे नाही, तर त्यातील काही अज्ञात घटक या कामामध्ये मदत करत असल्याचे लक्षात आले आहे. या अज्ञात घटकांमध्ये जीवनशैली, शिक्षण, एकूण आरोग्य यांचाही समावेश असावा.

पालेभाज्या व आरोग्य संबंधांबाबत झालेली संशोधने ः

  • २०१७ मध्ये झालेल्या अन्य अभ्यासामध्ये ल्युटेन हा पालेभाज्यांमध्ये आढळणारा कॅरेटीनॉइड घटक मेंदूतील पेशींचा ऱ्हास (अल्झायमरसारखे विकार) होण्यापासून वाचवतो. २००६ मध्ये महिलावर करण्यात आलेल्या एका अभ्यासाचेही निष्कर्ष मिळाले होते. याच संशोधक गटाने त्यात क जीवनसत्त्वाचा मोठा वाटा असल्याचा निष्कर्ष काढला होता.
  • जीवनसत्त्व ई, के याबरोबरच ल्युटेन, बीटा कॅरेटिन आणि फोलेट या घटकांचा फायदा होत असल्याचे आढळले होते. हे सारे घटक विविध भाज्यांतून उपलब्ध असतात. त्यामुळे एकूणच भाज्यांचा आहारामध्ये अधिक प्रमाणात समावेश असल्यास आरोग्यासाठी विविध मार्गाने फायद्याचे ठरत असल्याचे दिसून येते.

इतर बातम्या
चाळीतल्या कांद्याचे काय होणार?कांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...
रोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिकालहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे...
नांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
पुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...
सीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...
'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...
‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...
वनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
मराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...
नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...