agricultural stories in marathi, agro vision, Efficient technique discovered for isolating embryonic stem cells in cows | Agrowon

गायींच्या गर्भातील मूलपेशी अलग करण्यात यश
वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया - डेव्हिस
येथील संशोधकांनी गायींच्या गर्भातील मूलपेशी वेगळ्या करण्याची अत्यंत कार्यक्षम पद्धत विकसित केली आहे. गायीसारख्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या गर्भातील मूलपेशीचा उपयोग जनुकीय तपासण्या, जनुकीय अभियांत्रिकी आणि रोगांच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी होऊ शकतो. हे संशोधन ‘जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया - डेव्हिस
येथील संशोधकांनी गायींच्या गर्भातील मूलपेशी वेगळ्या करण्याची अत्यंत कार्यक्षम पद्धत विकसित केली आहे. गायीसारख्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या गर्भातील मूलपेशीचा उपयोग जनुकीय तपासण्या, जनुकीय अभियांत्रिकी आणि रोगांच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी होऊ शकतो. हे संशोधन ‘जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

गर्भातील मूलपेशींना योग्य वातावरण मिळाल्यास त्यांची वाढ होऊ शकतो. त्यातून कोणत्याही आकाराचे स्नायू तयार करणे शक्य होते. याचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक फायदे असल्याने गायींच्या गर्भातील मूलपेशी अलग करण्यासाठी ३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून संशोधक प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत कॅलिफोर्निया- डेव्हिस विद्यापीठातील संशोधकांनी एक विशिष्ट कल्चर यंत्रणा तयार केली आहे. या कल्चर यंत्रणेमुळे एकाच प्रयत्नामध्ये मूलपेशी कार्यक्षमपणे वेगळ्या करणे शक्य होते. गायींतील मूलपेशी वेगळ्या करण्यामध्ये यश आले आहे. याचा फायदा मानवी मूलपेशींच्या संशोधनासाठीही मोठ्या प्रमाणात होणार आहे.

गायींच्या उत्तम व वेगवान पैदाशीसाठी
प्रयोगशाळेमध्ये मुलपेशींच्या साह्याने विशिष्ठ गुणधर्मांची अंडी किंवा वीर्य तयार करणे शक्य होईल. यामुळे नव्या जातींच्या पैदाशीसाठीचा वेळ कमी होणार आहे. त्याविषयी माहिती देताना कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. पाब्लो रॉस यांनी सांगितले, की जनुकीय तंत्रज्ञानांचा वेग यामुळे वाढणार आहे. ज्या पैदास प्रक्रियेसाठी याआधी दशकांचा काळ लागत असे, ती केवळ दोन ते तीन वर्षांवर पोचेल. यातून अधिक उत्पादनक्षम, मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या आणि उष्ण वातावरणामध्ये चांगल्या रीतीने जुळवून घेणाऱ्या जाती तयार करता येतील.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...