आता आरोग्यासाठी ‘न्यूट्रासिटिकल्स’

आता आरोग्यासाठी ‘न्यूट्रासिटिकल्स’
आता आरोग्यासाठी ‘न्यूट्रासिटिकल्स’

औषधनिर्माणशास्त्र आणि अन्ननिर्मितीशास्त्र यांच्यादरम्यान असलेली दरी मिटवण्यासाठी न्यूट्रासिटिकल्स(पोषकताशास्त्र)ला अधिक चालना देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. ही उत्पादने आहारापलीकडे आणि औषधांच्या अलीकडे या स्थितीतील असण्याची गरज आहे. म्हणजेच ती खऱ्या अर्थाने आरोग्यासाठी तयार केलेली असली पाहिजेत, अशी मागणी या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. यासंबंधी इटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ नॅपोली फेड्रिको २ मधील संशोधक एट्टोरे नॉव्हेलिनो, अॅन्टोनेल्लो सॅन्टीनी यांचा एक अहवाल ब्रिटिश जर्नल ऑफ क्लिनिकल फार्माकॉलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.

बदलती जीवनशैली आणि आहारातील नानाविध घटक यांचा फटका सर्वसामान्य माणसांनाही बसू लागला आहे. पर्यायाने उपचारांसाठी औषधांचा वापरही वाढत आहे. त्याऐवजी आहार हेच औषध अशा स्वरूपामध्ये विचार व संशोधन होण्याची गरज आता व्यक्त होत आहे. आहाराद्वारे आजार रोखण्यासाठी प्रयत्न करता येतील. त्यातूनही आजार झाला तर आहारातील योग्य त्या बदलांद्वारे त्यावर उपचार करता येतील, ही संकल्पना आहे. प्राचीन काळी आयुर्वेदामध्ये औषधांसोबत पथ्ये सांगितली जात. त्याचाच हा नवा अवतार मानायला हरकत नाही. मात्र, या साऱ्या तंत्रांचा वापर, सुरक्षितता यांचा वैद्यकीय स्तरावर अधिक अभ्यास व संशोधन होण्याची गरज आहे.

  1. संशोधकांनी केलेली न्यूट्रासिटिकल्सची व्याख्या ः भाज्यातील फायटोकॉम्प्लेक्स किंवा प्राण्यांतील द्वितीय चयापचयकारक घटक म्हणजे न्यूट्रासिटिकल्स होय.
  2. हे दोन्ही घटक औषधांप्रमाणेच आरोग्यावरील चांगल्या परिणामांसाठी योग्य त्या तीव्रतेमध्ये व प्रमाणामध्ये दिले जातील. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव रोखणे किंवा उपचार करणे शक्य होणार आहे. याविषयी माहिती देताना डॉ. नोव्हॅलिनो म्हणाले की, सध्या रुग्णांच्या एकत्रित समजावर आधारीत आहार, विहार यामध्ये बदल होतो. अनेक वेळा दिल्या जाणाऱ्या पारंपरिक सल्ल्यामध्ये विसंगती किंवा अर्थ लावण्यामध्ये गफलत होते. हे सारे टाळण्यासाठी सुरक्षितता, कार्यपद्धती, कार्यक्षमता आणि वैद्यकीय विचार यांची सांगड घालत एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता निर्माण होते. त्यातून पूरक आहार आणि न्यूट्रासिटिकल्स वेगळे होतात.
  3. डॉ. सॅन्टिनी यांनी सांगितले, की खाद्यपूरक घटक आणि औषधे या दरम्यान न्यूट्रासिटिकल्स असतील. मात्र, यांच्या निर्मितीसाठी अधिक सजग राहण्याची व अधिक संशोधनाची आवश्यकता असेल. या उत्पादनाच्या लेबलमधील दावे हे भरपूर पुराव्यांनिशी असण्याची गरज आहे. तसेच अशा उत्पादनावर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रचंड नियंत्रणाची आवश्यकता असेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com