agricultural stories in marathi, agro vision, ethopian roses export to america | Agrowon

इथोपियन गुलाबाला खुणावतेय अमेरिकी बाजारपेठ
वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

पंधरा वर्षांपूर्वी एकही फूल निर्यात होत नसलेल्या इथोपियाने सातत्यपूर्ण धोरणातून जागतिक फूल उद्योगामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता पुढील ध्येय म्हणून अमेरिकेची बाजारपेठ त्यांना खुणावत असून, त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

पंधरा वर्षांपूर्वी एकही फूल निर्यात होत नसलेल्या इथोपियाने सातत्यपूर्ण धोरणातून जागतिक फूल उद्योगामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता पुढील ध्येय म्हणून अमेरिकेची बाजारपेठ त्यांना खुणावत असून, त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

सध्या अमेरिकन फूल बाजारपेठेमध्ये लॅटिन अमेरिकन देशातील उद्योजकांचा प्रामुख्याने अँडेज पर्वतीय प्रदेशातील इक्वेडोर आणि कोलंबिया येथील उत्पादकांचा मोठा हिस्सा आहे. फुलांमध्ये प्रामुख्याने लांब दांड्याच्या गुलाबासह अन्य सुशोभीकरणाच्या फुलांचाही समावेश आहे. या अमेरिकन बाजारपेठेमध्ये शिरकाव करण्याचे ध्येय इथोपिया येथील फूल उत्पादकांनी ठेवले आहे. जागतिक पातळीवरील महत्त्वाची अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेमध्ये फुलांची निर्यात करण्यात येणार आहे. वर्षभर फूल उत्पादनासाठी आवश्यक भरपूर सूर्यप्रकाश, उष्ण दिवस आणि थंड रात्री यांचे समतोल मिश्रण, यामुळे इथोपियातील फुलांचा दर्जाही उत्तम राहतो. त्यासाठी इथोपियाची अधिकृत एअरलाइन्स आपले वाहतुकीचे दर ठरवत आहे. मियामीपासून फुलांच्या आयातीचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या लॉस एंजेलिस किंवा न्यूयॉर्कपर्यंत ही विमानांची सेवा देण्यात येईल. त्याविषयी माहिती देताना इथोपियन एअरलाइन्सचे विभागीय व्यवस्थापक गिरूम अबेबे यांनी सांगितले, की सध्या प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या जेटद्वारे काही प्रमाणात फुलांची वाहतूक केली जाते. त्यात सुधारणा करीत विशेष व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे.

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...