वासरांमध्ये जन्मतः येणाऱ्या चेहरा विकृतीचे कारण शोधले
वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

कोपनहेगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी होलस्टीन गायींच्या वासरांमध्ये आढळणाऱ्या फेसियल डिस्प्लासिया सिंड्रोम या विकृतीसंदर्भात सातत्यपूर्ण जनुकीय अभ्यास केला असून, आतापर्यंत अज्ञात असलेल्या रोगाचा शोध घेतला आहे. पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळूमध्ये जनुकांचे म्युटेशन झाल्यामुळे ही स्थिती उत्पन्न होत असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासामुळे रोगाचा प्रसार रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो. हे संशोधन जर्नल बीएमसी जेनेटिक्समध्ये प्रकाशित झाले आहे.

कोपनहेगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी होलस्टीन गायींच्या वासरांमध्ये आढळणाऱ्या फेसियल डिस्प्लासिया सिंड्रोम या विकृतीसंदर्भात सातत्यपूर्ण जनुकीय अभ्यास केला असून, आतापर्यंत अज्ञात असलेल्या रोगाचा शोध घेतला आहे. पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळूमध्ये जनुकांचे म्युटेशन झाल्यामुळे ही स्थिती उत्पन्न होत असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासामुळे रोगाचा प्रसार रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो. हे संशोधन जर्नल बीएमसी जेनेटिक्समध्ये प्रकाशित झाले आहे.

उत्तम जातिवंत जनावरांच्या पैदाशीसाठी एका वळूचे वीर्य अनेक गायींसाठी वापरले जाते. त्यामुळे ज्याप्रमाणे त्याचे चांगले गुणधर्म पुढील पिढीमध्ये प्रवाहित होतात, त्याचप्रमाणे काही वाईट गुणधर्मही पुढे जातात. त्यामुळे अशा वळूमध्ये कोणताही रोग असल्यास त्याचा प्रसार वेगाने होतो. होलस्टीन वासरांमध्ये दिसून येणाऱ्या फेसियल डिस्प्लासिया सिंड्रोम विकृतीचाही प्रसार असाच होतो. अशा विकृतीग्रस्त वासरांच्या व त्यांच्या जन्मदात्या वळूचा जनुकीय अभ्यास कोपनहेगन विद्यापीठातील आरोग्य आणि वैद्यक शास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी केला आहे.

असा झाला अभ्यास
प्रा. जॉर्गन अगेरहोल्म यांनी सांगितलेल्या माहितीनुसार,

  • एका पैदाशीच्या वळूमध्ये वीर्यनिर्मिती करणाऱ्या स्नायूंच्या पेशीमध्ये म्युटेशन केले. त्यामुळे वासरांमध्ये अर्धा टक्के प्रमाणात विकृती निर्माण झाली. हे प्रमाण अत्यंत कमी दिसत असले तरी एका वळूपासून सुमारे दोन हजार वासरांचा जन्म होतो. आतापर्यंत ही वासरे मरून जात किंवा रोगाचा प्रसार टाळण्यासाठी त्यांना नष्ट करावे लागे.
  • विविध माध्यमातून अशा वासरांचा शोध घेऊन, त्याचा जनुकीय अभ्यास केला. या वासरांमध्ये सामान्य वासरांमध्ये नसलेले म्युटेशन आढळून आले. असाच प्रकार माणसामध्येही दिसून येतो, तो ही FGFR२ या जनुकाच्या म्युटेशनमुळे. मग संशोधकांनी या जनुकाचा वासरांच्या जनुकीय संरचनेमध्ये शोध घेतला.
  • वासरू आणि त्याचे पालक यांचे जनुकीय पातळीवर विश्लेषण करण्यात आले. त्यातून म्युटेशन हे तीव्र स्वरूपामध्ये असल्याचे दिसून आले. वासरांपर्यंत हे म्युटेशन त्याची आई किंवा पित्याकडून येते.

अशी आहे विकृती ः
वासराचे डोळे डोक्यापासून खाली लोंबत असतात. तोंड वेडेवाकडे असण्याच्या तीव्र स्वरूपामध्ये वासरांना श्वास घेण्यामध्ये अडचणी येतात. थोडक्यात, वासराला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. एकूणच या आजाराचे प्रमाण व मृत्यू कमी करण्यासाठी नव्या संशोधनाचा फायदा होऊ शकतो.

इतर बातम्या
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
उत्पादन, उत्पन्नवाढीसाठी गटशेतीची कास...देळेगव्हाण, जि. जालना  : शेती क्षेत्र घटत...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीनला '...परभणी : नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...