agricultural stories in marathi, agro vision, First report in decades of a forgotten crop pathogen calls for critical close monitoring | Agrowon

गहू पिकातील तांबेरा रोगाबाबत अधिक जागरुकता हवी
वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

गेल्या काही दशकांमध्ये पिकांवरील काही रोगकारक सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव कमी झाले आहेत. मात्र, भविष्यामध्ये ते पुन्हा उद्भवू शकतात. त्यासाठी शास्त्रज्ञ, पैदासकार, शेतकरी आणि संवर्धक गटांनी तयार राहण्याची गरज एका नव्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. कम्युनिकेशन्स बायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये ‘इंग्लंडमधील गहू पिकावर पुन्हा तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची संभाव्य शक्यता’ या लेखामध्ये अभ्यासाचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

गेल्या काही दशकांमध्ये पिकांवरील काही रोगकारक सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव कमी झाले आहेत. मात्र, भविष्यामध्ये ते पुन्हा उद्भवू शकतात. त्यासाठी शास्त्रज्ञ, पैदासकार, शेतकरी आणि संवर्धक गटांनी तयार राहण्याची गरज एका नव्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. कम्युनिकेशन्स बायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये ‘इंग्लंडमधील गहू पिकावर पुन्हा तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची संभाव्य शक्यता’ या लेखामध्ये अभ्यासाचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

इंग्लंडमध्ये साठ वर्षांपूर्वी गहू पिकांत तांबेरा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे गहू आणि बार्ली पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातून एका मोठ्या दुष्काळालाही पश्चिम युरोपातील लोकांना सामोरे जावे लागले होते. भविष्यामध्ये या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती संशोधक व्यक्त करत आहेत. नॉरविक येथील जॉन इन्स सेंटरमधील संशोधक डॉ. डियान सॉन्डर्स आणि डॉ. ब्रॅण्डे वुल्फ यांना २०१३ मध्ये सफोल्क येथील एका गहू रोपावर पुन्हा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळला होता. या रोगाच्या जनुकीय चाचण्या करून, त्याची तुलना करण्यात आली. त्या वेळी ही इंग्लंड येथे आढळलेली बुरशीची प्रजाती इथोपियामध्ये २०१३ मध्ये आढळलेल्या रोगासाठीही कारणीभूत असल्याचे दिसून आले. असाच पण कमी प्रमाणातील प्रादुर्भाव स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी या देशामध्येही आढळून आला.

संवेदनशीलता आणि हवामान ः

  • अधिक संशोधन करताना इंग्लंड येथील केम्ब्रीज विद्यापीठातील संशोधक डॉ. जेन थॉमस यांनी इंग्लंडमधील सुमारे ८० टक्के गहू जाती या बुरशीसाठी संवेदनशील असल्याचे आढळले. थोडक्यात, इंग्लंडमधील गहू पीक हे या रोगाच्या धोक्याखाली येऊ शकते. भविष्यात अन्य युरोपिय देशामध्येही या धोक्याची व्याप्ती वाढू शकते.
  • इंग्लंड येथील एक्सर्टर विद्यापीठातील डॉ. डॅनिअल बेब्बर यांच्या संशोधनानुसार, गेल्या २५ वर्षांमध्ये हवामानात होत असलेल्या बदलामुळे गहू पिकातील तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढीला योग्य वातावरण तयार होत असल्याचा दावा केला आहे. त्यातच युरोपियन गहू जातींमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये या रोगासाठी प्रतिकारकता उरलेली नाही.

संवर्धनाचे प्रयत्नही व्हावेत अधिक काळजीपूर्वक ः
तांबेरा रोगाच्या बुरशीसाठी बारबेरी (Berberis vulgaris) ही वनस्पती पर्यायी यजमान ठरते. त्यामुळे गहू तांबेरा रोगाची जीवनसाखळी पूर्ण होण्यास मदत होते. तृणधान्यावर तांबेरा रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरत असल्याच्या आशंकेमुळे २० व्या शतकाच्या सुरवातीला ही झुडपे मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आली. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून धोक्याच्या यादीत असलेल्या बारबेरी कार्पेट मॉथ या पतंगाच्या संवर्धनासाठी पुन्हा या वनस्पतीची लागवड करण्यात आली. अशा संवर्धनासाठी सरसकट अभियान राबवण्याऐवजी अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता या रोगाच्या पुन्हा होऊ घातलेल्या प्रादुर्भावामुळे निर्माण झाली आहे. पुढील टप्प्यामध्ये बारबेरी वनस्पतींच्या ठिकाणांचे नकाशे आणि नमुने गोळा करण्यात येतील. त्यासाठी संवर्धकांच्या गटांचे साह्य घेण्यात येणार असल्याचे सॉन्डर्स यांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...