agricultural stories in marathi, agro vision, flower like mushroom | Agrowon

अळिंबीप्रमाणे वाढणारे फूल !
वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

माणसाप्रमाणेच निसर्गामध्ये बहुरुप्यांची कमतरता नाही. विविध रंग रुप घेऊन आपल्या भक्षकाला फसविणे, गाफील ठेवणे किंवा प्रजोत्पादनासाठी प्रयत्न केले जातात. वनस्पतीही परागीकरणासाठी विविध हातखंडे अवलंबत असतात. त्यात कोबे विद्यापीठातील संशोधकांना अळिंबीचा भास निर्माण करणारे फूल आढळले आहे.

माणसाप्रमाणेच निसर्गामध्ये बहुरुप्यांची कमतरता नाही. विविध रंग रुप घेऊन आपल्या भक्षकाला फसविणे, गाफील ठेवणे किंवा प्रजोत्पादनासाठी प्रयत्न केले जातात. वनस्पतीही परागीकरणासाठी विविध हातखंडे अवलंबत असतात. त्यात कोबे विद्यापीठातील संशोधकांना अळिंबीचा भास निर्माण करणारे फूल आढळले आहे.

दक्षिण जपान येथील कुरोशिमा या बेटावर अस्पिडीस्ट्रा इलेटीओर ही आश्चर्यकारक वनस्पती प्रजाती आढळते. तिची परागीकरणाची पद्धत अन्य फुलांच्या तुलनेमध्ये भिन्न आहे. या वनस्पतीने आपल्या फुलांची रचना एखाद्या अळिंबीप्रमाणे विकसित केली आहे. या वनस्पतींचा शोध कोबे विद्यापीठातील प्रा. स्युत्सूगू केन्जी आणि स्युयोशी मासाहिरो यांनी घेतला आहे. त्यांचा शोध ‘इकॉलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

अस्पिडीस्ट्रा इलेटीओर ही सामान्यतः ‘कास्ट आयर्न प्लॅंट’ या नावाने ओळखली जाणारी शोभिवंत वनस्पती आहे. जगभरामध्ये वाढत असली तरी तिचे मूळ हे दक्षिण जपान येथील बेटांवर आहे. त्यावर येणारी जांभळी, चमकदार व दिसायला काहीशी अळिंबी प्रमाणे दिसणारी फुले जमिनीवर अर्धवट गाडलेल्या किंवा  पालापाचोळ्यामध्ये झाकलेल्या अवस्थेमध्ये येतात.   

अनेक वनस्पती या परागीकरणासाठी मधमाश्या आणि बंबलबीवर अवलंबून असतात. काही वनस्पतींचे परागीकरण अन्य प्राण्यातर्फे होते. उदा. केळीतील काही प्रजातींचे परागीकरण वटवाघळांद्वारे होते.  सुमारे शंभर वर्षापूर्वी अस्पिडीस्ट्रा इलेटीओर वनस्पतीला गोगलगायी सातत्याने भेट देत असल्याचे युरोपातील अभ्यासात प्रथम आढळले. त्यावरून गोगलगायींद्वारे त्यांचे परागीकरण होत असल्याचे मत मान्य झाले. मात्र, गोगलगायी या प्रामुख्याने वनस्पतींसाठी हानिकारक या सदरामध्ये मोडतात.

२००९ मध्ये डासाप्रमाणे दिसणारी ग्नॅटस ही माशी या वनस्पतीला भेट देत असल्याचे दिसून आले. मात्र, हाही वनस्पतींचा हा नैसर्गिक आवास नव्हता. त्यामुळे या वनस्पतीच्या नैसर्गिक आणि मूळ आवासामध्ये गेल्या दोन वर्षापासून अभ्यास केला. फुलांना भेट देणाऱ्या विविध कीटकांच्या नोंदी दिवस रात्र घेण्यात आल्या. यात एकही गोगलगायीने भेट दिली नाही. मात्र, ग्नॅटस या माशीने दिलेल्या भेटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परागकणांचे शरीरावर वहन केल्याचे दिसून आले. तिथून पुढे भेटी दिलेल्या अनेक ठिकाणी फळे लागलेली दिसली. त्यावरून खऱ्या अर्थाने या माश्याच अस्पिडीस्ट्रा इलेटीओर या वनस्पतीचे परागीकरण करत असल्याचे स्पष्ट झाले.

इतर बातम्या
आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव...सोलापूर  : आषाढी सोहळ्यातील शासकीय...
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडतराहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या...
विमा तर उतरविला; पण पावती आली कोरीऔरंगाबाद : नावाला ऑनलाइन मात्र सारंच ऑफलाइन...
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
देशातील जलाशयांमध्ये ३२ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलशयांमध्ये...
तालुका कृषी कार्यालयाचा कारभार हाकतात...गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
आज आषाढी एकादशीपंढरपूर :  त्रिविध तापांची झाली बोळवण ।...
विदर्भात अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या...
शासकीय महापूजेला मुख्यमंत्री जाणार नाहीतपुणे - आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
सोलापूर जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत नाही सोलापूर  : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
पीकविम्यापासून ४५ हजार शेतकरी वंचित जळगाव : जिल्ह्यात मागील हंगामात राबविलेल्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...