agricultural stories in marathi, agro vision, flowers home delivery experience by americanstudents | Agrowon

फुलांच्या घरपोच विक्रीचा राबविला अमेरिकन विद्यार्थ्यांनी प्रयोग
वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

अमेरिकेतील प्रसिद्ध सिलीकॉन व्हॅलीमध्ये कॉलेजमधील तीन मित्रांनी एकत्र येत फुले घरपोच देण्याची सेवा सुरू केली. त्याचे नाव ठेवले ‘अर्बन स्टेम्स’. आपल्याकडेही अशा सेवा सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या फुलांच्या मागणीमध्ये वाढ होऊन चांगला दर मिळण्यास मदत होईल.

अमेरिकेतील प्रसिद्ध सिलीकॉन व्हॅलीमध्ये कॉलेजमधील तीन मित्रांनी एकत्र येत फुले घरपोच देण्याची सेवा सुरू केली. त्याचे नाव ठेवले ‘अर्बन स्टेम्स’. आपल्याकडेही अशा सेवा सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या फुलांच्या मागणीमध्ये वाढ होऊन चांगला दर मिळण्यास मदत होईल.

अमेरिकेसह युरोपमध्ये प्रति दिन घरातील फूलदाणीमध्ये ताजी फुले ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे सकाळच्या दूध, भाज्यासोबत फुलांचीही खरेदी केली जाते. याचाच लाभ घेण्यासाठी दोन वर्षापूर्वी वॉशिंग्टन येथील कॉलेजवयीन मुले एकत्र आली. अजय कोली, जेफ शिली यांच्यासह त्यांचे मित्र जेरेमी होलीमॅन, चेतन शिनॉय आणि स्कॉट सिम्प्सन यांनी फुलांच्या विक्री विशेषतः घरे किंवा कंपनीपर्यंत पोचवण्याची सेवा सुरू केली होती. फुलांच्या बाजारपेठेमध्ये सर्वात मोठा सण म्हणजे व्हॅलेंटाइन. या प्रेमिकांच्या एकमेकापाशी व्यक्त होण्याच्या सणाच्या दिवशी लाल रंगाच्या गुलाबाला सर्वात अधिक मागणी असते. नव्याने सुरू झालेल्या या अर्बन स्टेम्स सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये तिप्पट अधिक ऑर्डर त्यांच्या हातात होत्या. मात्र, त्यात आव्हानही होते. कारण ही सर्व फुले नोंदवलेल्या प्रेमिकांच्या घरी एकाच दिवसात विशेषतः सकाळच्या वेळी पोचणे आवश्यक होते.

प्रत्येक डिलिव्हरीमध्ये नोंदवलेल्या आकाराच्या बुकेमध्ये, अगदी ठराविक रंग, लांबीच्या फुलांचा समावेश करण्यासाठी प्रत्यक्षामध्ये प्रचंड कष्ट करावे लागले. त्यासाठी कोरी, शिली यांच्यासह अनेक कर्मचारी कार्यरत होते. पहाटे तीन वाजल्यापासून बाईक आणि सायकलवरून बुके, फुले पोचवण्याची गडबड सुरू झाली. त्यांच्या हातात नावांची यादी आणि बुके होते. काही ग्राहकांनी सकाळीच प्रत्यक्ष फुले नेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे थोडासा उशीरही होत होता. हे त्यांचे केवळ दुसरेच वर्ष होते. काही ठिकाणी ऑर्डर पोचवण्यामध्ये उशीर झाला. त्याबद्दल काही ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. असे असले तरी अनेक ग्राहकांनी या मुलांच्या कष्टांना आणि प्रयत्नाला चांगली दादही दिली. त्यामुळे व्यवस्थापनामध्ये थोडाफार गोंधळ झाला तरी एक चांगला अनुभव मिळाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.

इतर बातम्या
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी...नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...