agricultural stories in marathi, agro vision, Freeloading orchid relies on mushrooms above and below ground | Agrowon

जगण्यासाठी संपूर्णपणे अळिंबीवर अवलंबून असलेले ऑर्किड !
वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

निसर्गामध्ये एकमेकांची नक्कल करणे ही काही नवीन बाब नाही. मात्र, ही नक्कल काही माकडाप्रमाणे दरवेळी टर उडविण्यासाठीच केली जाते असेही नाही. ऑर्किडची गॅस्ट्रोडिया प्युबिलाबायोटा (Gastrodia pubilabiata) ही प्रजाती चक्क अळिंबा किंवा खराब झालेल्या फळाची नक्कल करत असल्याचे दिसून आले आहे.

निसर्गामध्ये एकमेकांची नक्कल करणे ही काही नवीन बाब नाही. मात्र, ही नक्कल काही माकडाप्रमाणे दरवेळी टर उडविण्यासाठीच केली जाते असेही नाही. ऑर्किडची गॅस्ट्रोडिया प्युबिलाबायोटा (Gastrodia pubilabiata) ही प्रजाती चक्क अळिंबा किंवा खराब झालेल्या फळाची नक्कल करत असल्याचे दिसून आले आहे.

ऑर्किडच्या गॅस्ट्रोडिया प्युबिलाबायोटा या प्रजातीचा गंध ही नासलेल्या फळांसारखी किंवा अळिंबीसारखा असतो. त्यामुळे फळमाश्या फसगतीने या वनस्पतींच्या फुलामध्ये आपली अंडी घालतात. त्याचा फायदा वनस्पतीला परागीकरणासाठी होतो. जर या वनस्पतीच्या अवतीभवती खराब होत असलेल्या अळिंबी असल्यास परागीकरणाच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे आढळले आहे. त्याचप्रमाणे ही वनस्पती अळिंबीने जमवलेल्या पोषक घटकांचाही तग धरण्यासाठी वापर करते. ही ऑर्किड प्रजाती प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करत नाही. ज्या ठिकाणी प्रकाश पोचत नाही, अशा अंधाऱ्या स्थितीमध्येही ही वनस्पती अळिंबीच्या साह्याने चांगल्याप्रकारे जगू शकते. कोणतीही वनस्पती जमिनीवर परागीकरणासाठी किंवा जमिनीखाली पोषक घटकांसाठी अळिंबीवर अवलंबून असल्याचे हे पहिलेच उदाहरण असल्याचा दावा जपान येथील कोबे विद्यापीठातील सहयोगी प्रा. सुत्सुगू केन्जी यांनी केला आहे. त्यांचे संशोधन इकॉलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...