केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या दोन नव्या प्रजाती

केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या दोन नव्या प्रजाती
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या दोन नव्या प्रजाती

केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय विश्लेषणानंतर आजवर अज्ञात असलेल्या दोन नव्या प्रजाती असल्याचे आढळून आले आहे. त्याची माहिती जर्नल फ्रंटीयर्स इन इकॉलॉजी अॅँड इव्हॅल्युशनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. वटवाघळे ही आफ्रिकेतील जैवविविधतेबरोबर शेती आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. उत्तर अमेरिकेमध्ये केवळ ४४ वटवाघूळ प्रजाती आढळत असल्या, तरी वटवाघळांच्या प्रजातींची केनियातील संख्या ही ११० इतकी प्रचंड आहे. त्यामध्येही अनेक उपप्रजाती आहेत. आफ्रिकन यलो हाऊस बॅट या प्रजातीचा सखोल अभ्यास करताना संशोधकांना आणखी दोन प्रजाती आढळल्या आहेत. संशोधक टेरी डेमॉस यांनी सांगितले, की स्कोटोफिलस प्रजातीच्या वटवाघळांच्या आकार आणि गुणधर्मांमध्ये फरक आढळतो. पिवळ्या रंगाच्या या जाती घराच्या आढ्याला आढळतात. पंख असूनही ती अन्नाच्या शोधासाठी फार दूरपर्यंत प्रवास करत नाही. विशिष्ट प्रदेशामध्ये राहत असल्याने आफ्रिकेमध्ये वटवाघळांची जैवविविधताही मोठी आहे. त्यांच्यातील नेमक्या फरकांचा वेध घेण्यासाठी संशोधकांनी जनुकीय विश्लेषण तंत्राची मदत घेतली आहे. त्यातून आजवर शास्त्राला अज्ञात असलेल्या नव्या दोन प्रजाती आढळल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com