इनडोअर भाज्या उत्पादनासाठी अत्याधुनिक ‘ग्रोटेनर’

इनडोअर भाज्या उत्पादनासाठी अत्याधुनिक ‘ग्रोटेनर’
इनडोअर भाज्या उत्पादनासाठी अत्याधुनिक ‘ग्रोटेनर’

कतार येथील फळबागतज्ज्ञ ग्लेन बेहमॅन यांनी इनडोअर शेतीसाठी खास हवामान नियंत्रित असा कंटेनर तयार केला आहे. यात विविध भाज्यांचे उत्पादन घेणे शक्य असून, त्याला ग्रोटेनर असे नाव दिले आहे. कंटेनर असल्याने वाहनावरून त्याची सहजतेने वाहतूक करणे शक्य आहे. ग्रोटेनरमध्ये उभ्या पद्धतीने (व्हर्टिकल फार्मिंग) व पोषक पाण्यामध्ये (अॅक्वापोनिक्स) शेती करण्याची सोय केली आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक त्या सर्व घटकांची उदा. प्रकाश, तापमान यांची पूर्तता केली जाते. हे कंटेनर गोदामे किंवा कोणत्याही बंदिस्त जागेमध्ये ठेवता येतात. जहाजामध्ये वाहतुकीच्या वेळीही वनस्पतींची वाढ सुरू राहू शकते, त्यामुळे ग्राहकांना अत्यंत ताज्या भाज्या उपलब्ध होऊ शकतात. त्याविषयी माहिती देताना बेहमॅन यांनी सांगितले, की ग्रोटेनरमध्ये निसर्गाचीच प्रतिकृती तयार केली आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार पाणी, वारा, प्रकाश, तापमान यांचे कृत्रिमरीत्या नियंत्रण केले जाते. त्यासाठी संगणकाद्वारे चालवली जाणारी संपूर्ण स्वयंचलित प्रणाली तयार केली आहे. अत्यंत पोषक वातावरणामुळे दिवसाचे १८ ते २० तास वनस्पतीतील जैविक कार्ये सुरू असतात. परिणामी उत्पादनामध्ये वाढ मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com