agricultural stories in marathi, agro vision, harvesting the sun for power and farm produce | Agrowon

‘अॅग्रीफोटोहोल्टाइक’द्वारे एकाचवेळी सौरऊर्जा आणि खाद्यान्न निर्मिती शक्य
वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

एकाच वेळी सौरऊर्जानिर्मिती आणि
कृषी उत्पादन करण्याच्या उद्देशाने युनिव्हर्सिटी ऑफ होहेनहाइम येथे खास पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामुळे ऊर्जानिर्मिती व अन्नधान्य उत्पादन यातील संघर्ष कमी होण्यास मदत होईल.

एकाच वेळी सौरऊर्जानिर्मिती आणि
कृषी उत्पादन करण्याच्या उद्देशाने युनिव्हर्सिटी ऑफ होहेनहाइम येथे खास पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामुळे ऊर्जानिर्मिती व अन्नधान्य उत्पादन यातील संघर्ष कमी होण्यास मदत होईल.

जैवइंधन निर्मितीसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांमुळे अन्नधान्य उत्पादनासाठी उपलब्ध जागेवर मर्यादा येतात. सध्या सौरऊर्जा तंत्रामध्ये केवळ ऊर्जा मिळविण्याइतकेच लक्ष दिले जाते. त्यामुळे शेती किंवा ऊर्जा असे द्वंद्व निर्माण होते. एकाच वेळी दोन्ही उत्पादन शक्य झाल्यास यातील भविष्यात होऊ घातलेला संघर्ष रोखणे शक्य होऊ शकते, त्यासाठी एक वर्षापासून जर्मनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ होहेनहाइम येथे अॅग्रोफोटोहोल्टाइक हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हेगेलबाच येथील डिमीटर सहकारी फार्मवर पिकावरील आच्छादनामध्ये सौर पॅनेलचा वापर करण्यात आला आहे.   

माहिती देताना प्रकल्प व्यवस्थापक स्टिफन स्चिंदेले यांनी सांगितले, की गेल्या एक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. सामान्यतः घराच्या छतावर करण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये सौर पॅनेलची उभारणी शक्य झाली. हरितगृहामध्ये पिकांचे उत्तम उत्पादन मिळाले आहे. या तंत्रामुळे भांडवली खर्चात वाढ होत असली, तरी शेतकऱ्यांना दुहेरी उत्पादन मिळू शकेल.
अॅग्रीफोटोव्होल्टाइक तंत्राची संकल्पना १९८१ मध्ये प्रो, अॅडॉल्फ गोईट्झबर्गर यांनी मांडली, त्यासाठी फ्राऊनहोफर आयएसईची स्थापना केली. अॅग्रीफोटोव्होल्टाइक तंत्रामध्ये एकाच वेळी फोटोव्होल्टाईक (सौर तंत्रज्ञान) आणि अॅग्रिकल्चर ( वनस्पतींच्या साह्याने सूर्यप्रकाशांचा वापर अन्नधान्य निर्मितीसाठी) वापर शक्य आहे. मात्र या तंत्राच्या प्रसारासाठी सध्या उपलब्ध विविध तंत्रांमध्ये बदल करण्याची गरज आहे.  

  • पहिल्या वर्षामध्ये हिवाळ्यामध्ये गहू, बटाटा, सेलेरी आणि क्लोव्हर गवत ही पिके घेण्यात आली.
  • ग्लासहाउस उभारणी करताना योग्य दिशा, पाच मीटरपेक्षा अधिक उंची आणि त्यावरील पीव्ही मोड्यूल असलेली वैशिष्ट्यपूर्ण काच यांचा संगम करण्यात आला.
  • पीव्ही मोड्यूलची सावली पडणाऱ्या ठिकाणी पिकांची वाढ काही प्रमाणात कमी होते. सावली येत असलेल्या ठिकाणी क्लोव्हर गवताच्या उत्पादनामध्ये सामान्य पिकाच्या तुलनेमध्ये केवळ ५.३ टक्के घट झाली. बटाटा, गहू आणि सेलेरी पिकांच्या उत्पादनामध्ये १८ ते १९ टक्के घट झाली असल्याचे कृषी तज्ज्ञ पीटेरा होगी यांनी सांगितले.
  • मात्र भविष्यातील ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अशा एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता या प्रयोगातून अधोरेखित झाल्याचे मत जैव उत्पादन आणि ऊर्जा पीक विभागाचे मुख्य इरीस लेवान्डोवस्की यांनी व्यक्त केले.

    नव्या सौर ऊर्जा तंत्राची वैशिष्ट्ये

  • नव्या तंत्रामध्ये वापरलेल्या ७२० बायफेसियल पॅनेलमध्ये दोन्ही बाजूंनी मोड्यूल असल्याने प्रत्यक्ष सूर्यप्रकाश पडलेला भाग आणि त्यावरून परावर्तित होऊन खालील भागापर्यंत आलेल्या प्रकाशाद्वारे ऊर्जानिर्मिती होते. अगदी बर्फ पडत असतानाच्या स्थितीमध्येही मर्यादित प्रकाशामध्ये २५ टक्क्यांपर्यंतत अधिक ऊर्जा मिळू शकते.
  • यातून उपलब्ध होत असलेल्या १९४ किलोवॉट ऊर्जेतून ६२ कुटुंबांच्या ऊर्जेची गरज भागू शकते. पहिल्या १२ महिन्यांमध्ये १२६६ किलोवॉट तास वीज उपलब्ध झाली. जर्मनीतील ऊर्जा उपलब्धीची सरासरी ९५० kWh/kW इतकी आहे.
  • सध्या जर्मनीमध्ये कृषी क्षेत्रातील सुमारे १८ टक्के क्षेत्र हे जैवइंधनाच्या निर्मितीसाठी वापरण्यात येते. याक्षेत्रामध्येही नव्या तंत्राचा वापर अधिक फायदेशीर ठरतो.

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...