चीनमध्ये कोळशावरील बंदीचा फूल उत्पादकांना फटका

चीनमध्ये कोळशावरील बंदीचा फूल उत्पादकांना फटका
चीनमध्ये कोळशावरील बंदीचा फूल उत्पादकांना फटका

चीनमध्ये २०१८ या वर्षाच्या सुरवातीला काही उद्योगांमध्ये कोळशाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. त्यात नियंत्रित शेतीचाही समावेश असून, त्याचा मोठा फटका वातावरण उबदार ठेवण्यासाठी कोळशाचा वापर करणाऱ्या हरितगृह उत्पादकांना बसत आहे. यासाठी पर्याय असले तरी ते महागडे असल्याने या उद्योगांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.

चीनमध्ये हरितगृहामध्ये फुले विशेषतः जास्वंदीची (हिबिस्कस) लागवड केली जाते. येथील काही भागामध्ये तापमान अत्यंत कमी होते. हरितगृहामध्ये पाइपलाइनद्वारे गरम पाणी सर्वत्र फिरवून ते सामान्य पातळीवर आणण्यात येते. या भागामध्ये जास्वंदाच्या विविध जातींची पैदास करणाऱ्या कंपन्याही आहेत. त्यातील ग्राफ ब्रिडिंग या डॅनिश कंपनीचे प्रवक्ते जेकब ग्राफ म्हणाले, की आशियन बाजारपेठेसाठी जास्वंदाबरोबरच मांडववेल (डायप्लॅडेनिया), गुलाब, रक्तपर्णी (पॉईनसेटिया) यांचीही रोपे बनवली जातात. प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने शांघाय, बिजिंगसारखी मोठी शहरे आणि सीमावर्ती भागांमध्ये बंदी घालण्यात आली. तसेच काही उद्योगांमध्ये कोळशाच्या वापरावर सक्त मनाई केली आहे. उत्तरेकडील भागामध्ये तापमान उष्ण ठेवण्यासाठी कोळशांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. जास्वंद फुलांचा वापर फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या चिनी नववर्षाच्या स्वागतासाठी केला जातो. त्यामुळे फुलांची लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व कालावधी हिवाळी महिन्यात येतो. हरितगृहातील तापमान वाढवण्यासाठी कोळशाचा वापर होतो. त्यामुळे या पिकांच्या उत्पादनामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांश उत्पादकांनी आपल्या रोपांच्या मागणीत कपात केली किंवा रद्द केल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या न परवडणारे चिनी लोकांची मानसिकता ही नव्याचे स्वागत करण्याची आहे. दर काही कालावधीनंतर त्यांना नवीन उत्पादने लागतात. सुरवातीच्या काळामध्ये जास्वंद फुलांना चांगली मागणी मिळत होती. अलीकडे या फुलांच्या मागणीमध्ये घट होऊ लागली. त्यावर मार्ग काढण्यासाठी नव्या आकर्षक आणि सुधारीत जाती बाजारात आणल्या आहेत. या स्थितीमध्ये कोळशावरील बंदीची समस्या उद्भवली आहे. सामान्य उत्पादकांकडे तरी यावर काही पर्याय दिसत नाही. त्यांना अन्य काही पर्याय वापरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे अनेकांचे मत आहे. आशियामध्ये विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न

  • जे उत्पादक जास्वंद पीक घेतात, त्यातील सुमारे ८० टक्के उत्पादक हे पॉईनसेटियाही घेतात. त्याचप्रमाणे ३०-४० टक्के लोक डायप्लाडेनिया फूल पीक घेतात. त्यामुळे या फूल पिकांची रोपे बनविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. चीनसोबत आशियाई बाजारपेठेवर विक्री वाढण्याचा प्रयत्न अनेक रोप उत्पादक कंपन्या करत आहेत.
  • सध्याच्या स्थितीमध्ये उन्हाळ्यात जास्वंद आणि हिवाळ्यात पॉईनसेटिंया उत्पादनाला चालना देण्याचे नियोजन केले जात आहे. त्याचा हळूहळू फायदा होण्याची शक्यता आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com