agricultural stories in marathi, agro vision, How royal jelly helps honeybee larvae defy gravity and become queens | Agrowon

राणी मधमाशी निर्मितीसाठी रॉयल जेली ठरते महत्त्वाची
वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

मधमाश्यांच्या अळीअवस्थेमध्ये रॉयल जेलीचा आहार मोठ्या प्रमाणात दिल्यास राणी माशी तयार होते. हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र, रॉयल जेली राणीमाशी ज्या कप्प्यात वाढते, तिच्या खालील भागांच्या निर्मितीसह राणीमाशीच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची ठरत असल्याचे दिसून आले आहे. या रॉयल जेलीचा चिकटपणा (सामूमुळे) राणी मधमाशीला खाली पडण्यापासून वाचवतो. हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मधमाश्यांच्या अळीअवस्थेमध्ये रॉयल जेलीचा आहार मोठ्या प्रमाणात दिल्यास राणी माशी तयार होते. हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र, रॉयल जेली राणीमाशी ज्या कप्प्यात वाढते, तिच्या खालील भागांच्या निर्मितीसह राणीमाशीच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची ठरत असल्याचे दिसून आले आहे. या रॉयल जेलीचा चिकटपणा (सामूमुळे) राणी मधमाशीला खाली पडण्यापासून वाचवतो. हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कामकरी मधमाश्याद्वारे आहारामध्ये रॉयल जेलीचा केलेला भरपूर वापर हा अळीपासून राणी माशीच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतो. याविषयी माहिती देताना मार्टिन ल्यूथर विद्यापीठातील मूलद्रव्यीय पर्यावरणतज्ज्ञ अंजा बटस्टेड्ट यांनी सांगितले, की रॉयल जेली ही मुरंबा आणि मध यांचे योग्य मिश्रण असून, चिकट जेली प्रमाणे असते. राणीमाशीच्या कप्प्यामध्ये ती वरील बाजूला चिटकून राहते. या राणीमाशीचा आकार मोठा होत असल्याने सामान्य कप्प्यामध्ये ती बसू शकत नाही. अशा वेळी पोळ्याच्या खालील भागामध्ये कप्प्यांची आखणी केलेली असते. अन्य मधमाश्या अळ्यांसाठी मर्यादित प्रमाणात फूड जेली दिली जाते. त्याच वेळी राणीमाशीच्या कप्प्यामध्ये तिचे प्रमाण वाढवले जाते. हे वाढलेले प्रमाण तिच्या खाद्यासाठी आणि कप्प्यामध्ये चिकटून राहण्यासाठी उपयुक्त ठरते.

बटस्टेड्ट आणि त्यांच्या गटाने केलेल्या अभ्यासात, रॉयल जेलीच्या चिकटपणावर अधिक प्रयोग केले. वास्तविक ही पाण्याप्रमाणे पातळ असून, केवळ काही प्रथिनांमुळे तिच्यात घट्टपणा येतो. सामान्यतः त्याचा पीएच ४ असतो. पीएच ४ ते ५ च्यादरम्यान असताना त्यात लक्षणीय बदल होतात. उदासीन पीएचमध्ये ही जेली प्रवाहित होईल, इतकी पातळ होते. कामकरी माशीच्या ग्रंथीमध्ये रॉयल जेली तयार होते. त्या वेळी ती त्यातून सहजतेने बाहेर येण्यासाठी पातळ असण्याची आवश्‍यकता असते. त्यामुळे एका ग्रंथीमध्ये उदासीन पीएचमध्ये प्रथिनांची निर्मिती होते, तर दुसऱ्या ग्रंथीमध्ये पीएच कमी करणारी मेदाम्ले तयार होतात. या दोन्ही घटकांच्या एकत्रीकरणातून रॉयल जेली तयार होते. अन्य प्रजातीमध्येही काही प्रथिनांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशाच प्रकारचे पीएच यंत्रणा वापरली जाते.

केवळ रॉयल जेलीच्या अधिक आहारामुळे साध्या मधमाशीच्या अळीचे रूपांतर राणी मधमाशीमध्ये होतो. त्यामुळे रॉयल जेलीमधील अन्य प्रथिने आणि त्यांचे नेमके प्रमाण, त्याचे मधमाशीच्या आयुष्यातील स्थान यांचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे बटस्टेड्ट यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...