agricultural stories in marathi, agro vision, How turning down the heat makes a baby turtle male | Agrowon

कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय कोडे उलगडले
वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या तापमानानुसार कासवाच्या पिलांचे लिंग ठरत असल्याची माहिती संशोधकांना असली, तरी ते नेमके कशा प्रकारे होते, हे उलगडण्यात ड्यूक विद्यापीठातील संशोधकांना प्रथमच यश आले आहे. अंडी उबण्याच्या प्रक्रियेमध्ये Kdm६b हे जनुक जैविक थर्मामीटरप्रमाणे कार्य करते.

गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या तापमानानुसार कासवाच्या पिलांचे लिंग ठरत असल्याची माहिती संशोधकांना असली, तरी ते नेमके कशा प्रकारे होते, हे उलगडण्यात ड्यूक विद्यापीठातील संशोधकांना प्रथमच यश आले आहे. अंडी उबण्याच्या प्रक्रियेमध्ये Kdm६b हे जनुक जैविक थर्मामीटरप्रमाणे कार्य करते.

जागतिक तापमानवाढीचे विपरीत परिणाम विविध प्राण्यांवर होताना दिसतात. अशा वेळी नैसर्गिक तापमानावर अंडी उबणाऱ्या प्राण्यांवर (उदा. कासव व अन्य सरीसृप) अधिक विपरीत परिणाम होणार आहेत. मात्र, कासवांमध्ये पिलांचे लिंग तापमानानुसार ठरत असल्याने भविष्यामध्ये एकाच लिंगाची पिले पैदास होण्याचा धोका शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. ही प्रक्रिया सुमारे ५० वर्षांपासून शास्त्रज्ञांना ज्ञात असली, तरी त्यामागील जनुकीय कारणांचा शोध घेण्यात ड्यूक विद्यापीठातील संशोधकांसह चीन येथील झेजियांग वान्ली विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. त्याविषयी माहिती देताना ड्यूक विद्यापीठातील पेशीजीवशास्त्राचे प्रा. ब्लांचे कॅपेल यांनी सांगितले, की तापमानाधारीत लिंग निर्धारण प्रक्रिया ही मानवांसाठी कायम गूढ राहिली आहे. जैविक थर्मामीटर म्हणून काम करणाऱ्या जनुकांचा शोध घेण्यात आला असून, त्याद्वारे पिलांचे लिंग ठरते. माणसासारख्या सस्तन प्राण्यामध्ये साधारणपणे गुणसूत्रातील अनेक बाबी त्यासाठी कार्यरत असतात. मात्र, पाली, कासव, मगर यांसारखे सरीसृप वर्गातील प्राण्यांमध्ये असलेली अंडी उबण्याच्या काळातील तापमानावर त्याचा निर्णय ठरतो.

या प्रयोगामध्ये लाल कानांच्या कासवाची अंडी ३२ अंश सेल्सिअस तापमानावर उबवल्यास त्यातून सर्व मादी पिले बाहेर पडतात. तर काही अंडी २५ अंश सेल्सिअस तापमानावर उबवल्यास नर पिले बाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यापेक्षा कमी तापमानावर अंडी उबल्यास लैंगिक अवयव अविकसित राहण्याचा धोका असतो. अशा थंड वातावरणामध्ये Kdm६b हे जनुक कार्यान्वित होत असल्याचे आढळले आहे. त्यानंतर अन्य जनुके आपल्या कार्याला सुरवात करतात. हे संशोधन जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...