चिनी लसणांच्या उत्पादनामध्ये सातत्याने होतेय वाढ

चिनी लसणांच्या उत्पादनामध्ये सातत्याने होतेय वाढ
चिनी लसणांच्या उत्पादनामध्ये सातत्याने होतेय वाढ

गेल्या काही वर्षांतील उत्तम मागणी व चढते दर यामुळे चायनीज लसणाखालील क्षेत्रामध्ये वेगाने वाढ होत आहे. परिणामी, २०१९ पर्यंत निर्यात आणि स्थानिक बाजारामध्ये अधिक उत्पादन येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. लसूण हे चीनमधील सर्वांत महत्त्वाच्या कृषी उत्पादनापैकी एक असून, जागतिक पातळीवर निर्यातीमध्ये ७० ते ८० टकक्यांपर्यंत वाटा असतो. एकूण उत्पादन आणि दर्जा या बाबती चायनीज लसून हा सरस मानला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चायनीज लसणाची मागणी व लोकप्रियता सातत्याने वाढत राहिली आहे. २०१६ मध्ये स्थानिक पातऴीवर असलेल्या उत्तम किमतीमुळे चायनीज लसणांच्या निर्यातीचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर २०१७ मध्ये हळूहळू त्यात सुधारणा झाली. त्यानंतर निर्यातीच्या प्रमाणामध्ये वेगाने वाढ झाली. या वर्षी रोग आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे. अर्थात, ही नियमित बाब असली तरी वाढती मागणी पुरवण्यासाठी क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांपासून लसणांच्या किमती बाजारात उत्तम असून, शेतकऱ्यांनी लसूण लागवडी वाढवल्याचे चित्र आहे. अशा स्थितीमध्ये २०१९ मध्ये लसणाचे उत्पादन मागणीपेक्षा अधिक होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com