भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस समाधानकारक राहील.
ताज्या घडामोडी
कीटक हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असून, त्यांचा मानवी आणि पशु आहारामध्ये गेल्या अनेक शतकांपासून वापर होत आला आहे; मात्र जागतिक पातळीवरील काही देशांमध्ये हा आहार आवडीने घेतला जात असला, तरी अनेक देशांमध्ये त्याला आहार मानले जात नाही. भविष्यामध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कीटकयुक्त आहारावर अधिक प्रमाणात संशोधनाची आवश्यकता आहे.
कीटक हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असून, त्यांचा मानवी आणि पशु आहारामध्ये गेल्या अनेक शतकांपासून वापर होत आला आहे; मात्र जागतिक पातळीवरील काही देशांमध्ये हा आहार आवडीने घेतला जात असला, तरी अनेक देशांमध्ये त्याला आहार मानले जात नाही. भविष्यामध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कीटकयुक्त आहारावर अधिक प्रमाणात संशोधनाची आवश्यकता आहे.
आहारामध्ये कीटक ही संकल्पनाच अनेक देशांमध्ये शिसारी आणणारी मानली जाते; मात्र कीटकांच्या शरीरामध्ये असलेल्या उच्च दर्जाच्या प्राणीज प्रथिनांमुळे जागतिक पातळीवर वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पोषणासाठी आहारामध्ये कीटकांचे स्थान मोलाचे असणार आहे. अन्य पशुपालनाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी कार्बन फूटप्रिंट असल्याने त्यांच्या वाढीचे पर्यावरणावरील परिणामही अल्प असतील; मात्र सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांचा विचार होण्याची गरज असल्याचे मत न्युट्रिशन बुलेटीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात मांडण्यात आले आहे.
नॉटिंगहॅम विद्यापीठ आणि रोथामस्टेड संशोधन संस्थेतील संशोधक दार्जा डॉबरमॅन यांनी सांगितले, की पोषकतेच्या दृष्टीने अत्यंत मोलाची असलेल्या कीटकांविषयी अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. त्यातून उपलब्ध होणारी नेमकी प्रथिने आणि कार्बन फूटप्रिंट यांची विचार होण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे कीटकांचे उत्पादन वाढण्यासंदर्भात फारसा विचार कोणी केलेला नाही. त्यासंबंधीही फारशी माहिती उपलब्ध नाही. या साऱ्या घटकांचा साकल्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ती पोल्ट्री किंवा सोयाबीन पदार्थांची महागडी आवृत्ती ठरण्याचाही धोका आहे.
कीटकयुक्त आहाराची सद्यःस्थिती ः
- जगभरातील शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये खाण्यायोग्य कीटक प्रजातींची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक होईल. मध्य आफ्रिकेतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहार प्रथिने ही कीटकांच्या स्वरूपात येतात. काही वेळा त्यांना अन्य प्राणीज प्रथिनांपेक्षाही अधिक किंमत मिळते.
- या पद्धतीसाठी अनेक देशांमध्ये कोणतेही नियम ठरलेले नाहीत. त्यामुळे धोरणांची आवश्यकता आहे.
- कीटकांचे संवर्धन करून, त्यांना योग्य प्रकारे पकडण्यासाठी अवजारे, पद्धती विकसित झालेल्या नाहीत.
- कीटकांच्या वाढीच्या नेमक्या कोणत्या अवस्थेमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते, हे माहीत नाही. त्याच प्रमाणे खाण्याच्या पद्धतीही अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. कीटकानुसार कच्चे, तळलेले, शिजवलेले किंवा त्यांचे पीठ करून त्याचा वापर करता येऊ शकतो.
खाद्ययोग्य कीटक ः
खाद्ययोग्य कीटकांमध्ये भुंगेरे (Coleoptera, ३१%), फुलपाखरे (Lepidoptera, १८%), मधमाश्या, वास्प आणि मुंग्या (Hymenoptera, १४%), तुडतुडे, टोळ किंवा क्रिकेट (Orthoptera, १३%), किकाडा, खवले कीटक (Hemiptera, १०%), वाळवी (Isoptera, ३%), ड्रॅगनफ्लाय (Odonata, ३%), आणि विविध माश्या (Diptera, २%) यांचा समावेश होतो.
- 1 of 142
- ››