केनियाचा हरित ऊर्जेकडे वेगाने प्रवास सुरू

केनियाचा हरित उर्जेकडे वेगाने प्रवास सुरू
केनियाचा हरित उर्जेकडे वेगाने प्रवास सुरू

केनिया शासन अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या माध्यमातून २०३० पर्यंत विजेची गरज भागविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये एकूण वीज गरजेच्या ८० टक्क्यापर्यंतची ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून मिळविण्याचे नियोजन केले आहे. जर्मनीतील खासगी कंपन्यांचीही मदत भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी घेतली जात आहे. अर्ध्यापेक्षा अधिक केनियन कुटुंबापाशी विजेचे कनेक्शन नाही. या लोकांपर्यंत वीज पोचविण्यासाठी केनिया सध्या भूऔष्णिक, पवन आणि सौरऊर्जानिर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. त्याविषयी माहिती देताना केनियातील ऊर्जा तज्ज्ञ मायकेल अॅण्ड्रेस यांनी सांगितले, की पूर्व आफ्रिकेतील रिफ्ट या नरकाचे द्वार मानले जातात. येथे जमिनीला मोठ्या भेगा पडलेल्या असून, त्यातून बाष्पाचे उष्ण ढग सातत्याने बाहेर फेकले जातात. त्यातून टर्बाईन फिरवून ऊर्जेच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. जल ऊर्जेवरील प्रकल्प गेल्या काही वर्षांतील दुष्काळामुळे धोक्यात आले आहेत. त्यातच खनिज इंधनाचे प्रमाण केनियामध्ये अत्यंत कमी असल्याने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करावा लागतो. जियोथर्मल ऊर्जेच्या निर्मितीच्या क्षमता सुमारे २३ स्थानांवर आहेत. त्यातून सुमारे १० हजार मेगावॉट ऊर्जा मिळू शकते. सध्या केनियाची वीजनिर्मितीची क्षमता केवळ २४०० मेगावॉट आहे. भूऔष्णिक ऊर्जा शाश्वत पर्याय ः

  • केनियातील भूऔष्णिक ऊर्जा मिळविण्याची प्रक्रिया सोपी असेल, असा अंदाज आहे. कारण भूगर्भामध्ये तीन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर ती उपलब्ध आहे. त्यावर खडकही तुलनेने ठिसूळ असून, ड्रिलिंगसाठी सोपा मानला जातो. परिणामी, जर्मनीच्या तुलनेमध्ये येथे भूऔष्णिक ऊर्जा ही स्वस्त पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. दोन सेंटपेक्षाही कमी किमतीमध्ये एक किलोवॉट आवर ऊर्जा मिळू शकेल. ही अपारंपरिक ऊर्जा असून, त्यातून कर्बवायूचे उत्सर्जन होत नाही. त्यावर हंगाम किंवा हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही.
  • सध्याच्या हायड्रोपॉवर प्रकल्पावर सातत्याने पडत असलेल्या अवर्षणाचा मोठा परिणाम होतो.
  • सौरऊर्जा ही तुलनेने लघू प्रकल्पासाठी उत्तम उपाय ठरू शकत असला, तरी मोठ्या प्रकल्पांसाठी त्याची उपयुक्तता कमी मानली जाते. त्यातून सुमारे ५ ते १० टक्के विजेची गरज भागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
  • गुंतवणूक ः साधारणतः २०३० पर्यंत ऊर्जानिर्मिती व वितरण क्षेत्रामध्ये ३० ते ५० अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक अपेक्षित आहे. एकूण ऊर्जा निर्मितीतील ८० टक्क्यांपर्यंतचा भाग हा अपारंपरिक ऊर्जेतून मिळविण्याचा प्रयत्न असेल. केनिया शासनाच्या मर्यादित आर्थिक निधीमुळे खासगी उद्योगांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे ११ खासगी वीज उत्पादक कंपन्यांसोबत दीर्घकालीन करार करण्यात आले आहेत. जर्मनीचा सहभाग ः गेल्या २० वर्षांपासून केनियन ऊर्जा क्षेत्रामध्ये जर्मनी कार्यरत आहे. सध्या भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये जर्मनीतील केएफडब्ल्यू आणि जीआयझेड यांनी ३८० दशलक्ष युरो गुंतवणूक केली आहे. त्याच प्रमाणे ओल्कारिया ३ भूऔष्णिक प्रकल्पासोबत तुर्किना पवन ऊर्जा फार्ममधून ऊर्जा मिळू शकेल. यातून ग्राहकांचाही फायदा होणार आहे. त्यांना सध्याच्या डिझेल इंजिन जनरेटरद्वारे मिळणाऱ्या विजेच्या तुलनेत २४ टक्क्यांनी कमी दरामध्ये वीज मिळू शकेल.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com