agricultural stories in marathi, agro vision, Large outdoor study shows biodiversity improves stability of algal biofuel systems | Agrowon

शेवाळांच्या एकत्रित उत्पादनातून मिळेल जैवइंधन शाश्‍वतता
वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

शेवाळांच्या विविध प्रजातींच्या एकत्रित वापरातून जैवइंधनाच्या निर्मितीमध्ये शाश्‍वतता आणणे शक्य होणार असल्याचे मत मिशीगन विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे. त्यासाठी बाह्य घटकांकडून होणाऱ्या उपद्रवावर मात करण्यासाठीही शेवाळांची जैवविविधता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ग्लोबल चेंज बायोलॉजी- बायोएनर्जी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

शेवाळांच्या विविध प्रजातींच्या एकत्रित वापरातून जैवइंधनाच्या निर्मितीमध्ये शाश्‍वतता आणणे शक्य होणार असल्याचे मत मिशीगन विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे. त्यासाठी बाह्य घटकांकडून होणाऱ्या उपद्रवावर मात करण्यासाठीही शेवाळांची जैवविविधता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ग्लोबल चेंज बायोलॉजी- बायोएनर्जी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जैवइंधनासाठी खाद्यपिकांखालील जमिनीचा वापर वाढल्यास त्याचे विपरीत परिणाम अन्नसुरक्षिततेवर होणार आहेत. त्यामुळे मिशीगन विद्यापीठातील ई. ए. जॉर्ज रिझर्व्ह या परिसरात ८० कृत्रिम तलावांमध्ये गोड्या पाण्यातील विविध शेवाळ प्रजातींच्या एकत्रित वाढवण्याचे प्रयोग करण्यात येत आहेत. यात शेवाळाच्या जैवविविधतेचा फायदा अधिक बायोमास उपलब्धीसाठी घेण्याचे नियोजन आहे.

एकाच शेवाळाची वाढ करण्याला मोनोकल्चर पद्धती म्हणतात. त्यापेक्षा शेवाळांच्या विविध प्रजातींचे एकत्रित करून (त्याला पॉलिकल्चर म्हणतात.) त्यांच्या एकमेंकाच्या वाढीवर होणारे परिणाम तपासण्यात येत आहेत. त्याविषयी माहिती देताना संशोधिका केसी गोडविन यांनी सांगितले, की पॉलिकल्चर पद्धतीमध्ये मोनोकल्चरच्या तुलनेमध्ये अधिक बायोमास उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले. मात्र, या पद्धतीमध्ये दीर्घळाळ शाश्‍वत उत्पादन देण्याची क्षमता असल्याचे आढळले.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...