पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत अन्नसाखळीत

पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत अन्नसाखळीत
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत अन्नसाखळीत

पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक घटकांचा (पीओपीएस) मानवी आरोग्यासाठी धोका वाढत आहे. हे घटक सरळ संपर्क, श्वसनावाटे आणि प्रदूषित खाद्यपदार्थावाटे मानवी शरीरात प्रवेश करतात. अलीकडे आहाराविषयी जागरूकता वाढत असली तरी खात असलेल्या मासे, प्राणी, पक्षी यांच्या आहारांच्या मूळ स्रोतांकडेही लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत पीट्सबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नल एन्व्हायर्न्मेंटल सायन्स अॅंड टेक्नॉलॉजीमध्ये याविषयी संशोधनपर खास लेख प्रकाशित झाला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, कापड आणि प्लॅस्टिक उद्योगामध्ये अग्निरोधक म्हणून पॉलिब्रोमिनेटेड डिफिनिल इथर्स (पीबीडीईएस) हा कृत्रिम घटक वापरला जातो. त्याचे अंश विविध प्राण्यांच्या शरीरात आढळत असून, या प्राण्यांच्या मांसावाटे मानवी शरीरातही शिरकाव करत आहेत. संशोधक डॉ. एनजी यांनी आपल्या संशोधनातून या घटकांच्या मागोवा घेतला आहे. त्याविषयी माहिती देताना डॉ. एनजी म्हणाले की, सन २००४ पासून अमेरिका आणि युरोपातील बहुसंख्य देशांनी पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव काही पीबीडीईएस घटकांच्या वापरावर बंदी घातलेली आहे. हा घटक शरीरातील इंडोक्रिनच्या कार्यामध्ये अडथळे आणत असल्याने विकासावर परिणाम होतो. लहान मुले यासाठी अधिक संवेदनशील असतात. २००९ मध्ये स्कॉकहोम येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण करारानुसार पीबीडीईएस घटकांवर बंधने आणण्याचे ठरले. मात्र, या घटकांचा आयुष्यकाळ मोठा असून, बहुतांश ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये वापर होतच आहे. चीन, थायलंड, व्हिएतनाम अशा देशांमध्ये टाकाऊ इलेक्ट्रॉनिक घटकांचा पुनर्वापरासंदर्भात फारसे नियम नाहीत. त्याचा फटका एकूण पर्यावरणाला बसत आहे. अशा अनेक देशांतून पशुखाद्य आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे येत असून, त्याद्वारे प्रदूषक घटकांचा प्रसार सुरू आहे. अमेरिकेत मत्स्यपालनामध्ये अशा आहाराचा अधिक वापर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com