agricultural stories in marathi, agro vision, Medium-sized carnivores most at risk from environmental change | Agrowon

मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण बदलाने धोक्यात
वृत्तसेवा
शनिवार, 9 डिसेंबर 2017

मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर पर्यावरणातील बदलांचे विपरीत परिणाम अधिक प्रमाणात जाणवणार असल्याचे लंडन येथील इंपिरिअल कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन ‘जर्नल नेचर इकॉलॉजी अॅँड इव्हॉल्युशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर पर्यावरणातील बदलांचे विपरीत परिणाम अधिक प्रमाणात जाणवणार असल्याचे लंडन येथील इंपिरिअल कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन ‘जर्नल नेचर इकॉलॉजी अॅँड इव्हॉल्युशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सस्तन शिकारी प्राणी हे जीवनातील अधिक काळ हा सावजाचा शोध आणि शिकारीमध्ये घालवत असतात. यासाठी त्यांची मोठी ऊर्जा खर्च होते. पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी शिकार करावी लागते. असे नैसर्गिक चक्र असल्याने प्रामुख्याने पाने खाणाऱ्या भक्ष्यावर त्यांना अवलंबून राहावे लागते. प्राण्यांचा आकार जसा वाढत जातो, तसा त्याचा खाद्य शोधण्यासाठी कालावधी कमी होत असल्याचे मानले जाते. मात्र, लंडन येथील इंपिरिअल कॉलेज व प्राणिशास्त्र सोसायटी यांनी केलेल्या संशोधनामध्ये यापेक्षा वेगळेच तथ्य समोर आले आहे.

  • यासाठी संशोधकांनी जमिनीवरील शिकारी प्राण्यांच्या माहितीचा पाण्यातील आकाराने वाघाएवढ्या असलेल्या सील या प्राण्यांचा तुलनात्मक अभ्यास केला.
  • सर्व प्रजातींमध्ये मध्यम आकाराच्या (एक ते दहा किलो वजनाच्या) प्राण्यांचा सर्वाधिक काळ हा सावजाचा शोध आणि शिकारीमध्ये जातो. उदा. मालाय सिव्हेट, इरिमोटे कॅट, चित्ते, खेकडे खाणारे लांडगे. अशा प्राण्यांवर पर्यावरणातील बदलांचे होणारे परिणाम गणितीय पद्धतीने तपासण्यात आले. त्याविषयी माहिती देताना इंपिरिअल कॉलेजमधील जैविकशास्त्र विभागातील संशोधक डॉ. सम्राट पवार यांनी सांगितले, की या अभ्यासामध्ये प्राण्यांचा आकार आणि त्यांचा खाद्य शोधण्यासाठीचा कालावधी याविषयी गणितीय मॉडेल तयार करण्यात आले आहे. पर्यावरणातील बदलांचे या शिकारी प्राण्यावर होणारे परिणामांचा अंदाज मिळवणे शक्य होणार आहे.
  • शरीराचा आकार आणि खाद्य शोधण्याचा कालावधी या गृहीतकाच्या चाचण्या घेण्यासाठी जगभरामध्ये आतापर्यंत झालेल्या संशोधनातून माहिती गोळा करण्यात आली. यात जमिनीवर मांसभक्ष्यण अशा ७३ प्रजातींचा आणि मागोवा घेण्याच्या रेडिओ कॉलर आणि जीपीएससारख्या विविध पद्धतींचा समावेश होता.

निष्कर्ष ः
ज्या मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांचे भक्ष्य हे आकाराने लहान आहेत, त्यांची शिकारीसाठीची धावपळ बदलत्या वातावरणामुळे वाढण्याची शक्यता आहे. परिणामी त्यांच्या ऊर्जाविषयक गरजांची पूर्तता होणे कठीण आहे. बदलत्या वातावरणामुळे अनेक प्राण्यांच्या रहिवासामध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे खाद्य शोधण्यासाठी अधिक धावपळ करावी लागणार असून, त्याचा ताणही प्रचंड असणार आहे. त्याचप्रमाणे या प्राण्यांचे भक्ष्य नेमके कोणते आहे, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे सहलेखक मॅट्टेओ रिझ्झूटो यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...