agricultural stories in marathi, agro vision, Methane stimulates massive nitrogen loss from freshwater reservoirs in India | Agrowon

पाण्यातील नत्राचे प्रमाण कमी करण्यामध्ये मिथेन मोलाचा
वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

गोड्या पाण्याच्या स्रोतामधील कार्यक्षम नायट्रोजनच्या प्रमाणामध्ये लक्षणीयरीत्या घट होण्याच्या प्रक्रियेतील अनेक बाबींचा उलगडा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात झालेला आहे.

गोड्या पाण्याच्या स्रोतामधील कार्यक्षम नायट्रोजनच्या प्रमाणामध्ये लक्षणीयरीत्या घट होण्याच्या प्रक्रियेतील अनेक बाबींचा उलगडा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात झालेला आहे.

मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणामध्ये कार्यक्षम नत्राचे प्रमाण वेगाने वाढत आहे. एकट्या भारतामध्ये जागतिक रासायनिक नत्र वापराच्या एक पंचमाश नत्राचा वापर होतो. जागतिक पातळीवर अशा नत्रामुळे पर्यावरण विशेषतः गोड्या पाण्यामध्ये होणाऱ्या प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहिले जाते. कारण त्यामुळे पाण्यामध्ये शेवाळांचे प्रमाण वाढण्यासोबतच ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्याचा फटका जलचरांना बसतो. भारतातील १५ धरणे, तलाव यांचा विस्तृत असा अभ्यास आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केला. या गटामध्ये भारत, जर्मनी, इंग्लंड येथील संशोधकांचा समावेश होता.

उन्हाळ्यामध्ये बहुतांश तलावाच्या पृष्ठभागावरील थोडासा भाग सोडल्यास खाली ऑक्सिजनची कमतरता आढळली. अशा स्थितीमध्ये नायट्रेट घटकांचा वापर सूक्ष्मजीवांकडून केला जातो. नायट्रेट (NH3) पासून उदासीन अशा नायट्रोजन (N) मध्ये रुपांतरीत होण्याच्या क्रियेला ‘डिनायट्रीफिकेशन’ असे म्हणतात. या डिनायट्रीफिकेशनचा दर लक्षणीयरीत्या कमी आढळला.
 मात्र, ज्या तलावामध्ये मिथेनचे प्रमाण अधिक होते, तिथे डिनायट्रीफिकेशनचा दर १२ पटीने वाढल्याचे आढळले. म्हणजेच मिथेन हा हरितगृह वायू गोड्या पाण्यातील नत्राचे प्रमाण कमी करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...