केवळ कॅव्हेंडिश केळी लागवडीऐवजी जैवविविधता जपणे आवश्यक

केवळ कॅव्हेंडिश केळी लागवडीऐवजी जैवविविधता जपणे आवश्यक
केवळ कॅव्हेंडिश केळी लागवडीऐवजी जैवविविधता जपणे आवश्यक

गेल्या दशकामध्ये कॅव्हेन्डिश केळी पिकामध्ये पनामा आणि काळा सिगाटोका या रोगांचा धोका वाढत आहे. या रोगासाठी प्रतिकारक जातींच्या विकासासाठी फारसे संशोधन झालेले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन येएथील प्रो. गेर्ट केमा यांनी सांगितले. एकाच जातीला चिकटून राहणे धोक्याचे कॅव्हेंडिश केळी पनामा रोगासाठी त्यातही ट्रॉपिकल रेस ४ या प्रजातीसाठी अतिसंवेदनशील ठरत आहेत. वॅगेनिंगनमध्ये झालेल्या संशोधनामध्ये टीआर४ चा प्रादुर्भाव झाल्यानंतर एका दिवसात ओळखण्याची नवी पद्धत विकसित केली आहे. पूर्वी त्यासाठी सुमारे तीन महिने लागत असते. या संशोधनानंतर आग्नेय आशियाचा भाग सोडून प्रथम जॉर्डन आणि मोझांबिक येथेही मोल्ड रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. दक्षिण अमेरिकेमध्येही या रोगांचे पूर्ण उच्चाटन झाल्याचे दिसून येत नाही. त्याच प्रमाणे भारत, ओमान, लेबॅनन आणि पाकिस्तान या देशांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

  • अशी स्थिती १९५० मध्येही उद्भवली होती. त्या वेळी ग्रोस मायकेल या केळी जात लागवडीतून कमी होत गेली. एकाच प्रजातीच्या मोठ्या प्रमाणात लागवडीमुळे असे प्रश्न सातत्याने उभे राहू शकतात. या वेळी ती बाब कॅव्हेंडिश केळीबाबत घडत आहे.
  • एकाच जातीमुळे मातीपासून रोपांपर्यंत रोगांचा प्रसार वेगाने होतो. चीनमध्ये झालेल्या प्रादुर्भावित केळी रोपांच्या लागवडीमुळे शेजारच्या देशामध्ये (उदा. लावोस, व्हिएतनाम आणि कंबोडिया)ही प्रसार वाढतो. निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वकपणे करण्याची गरज त्यातून पुढे येत आहे.
  • नव्या जातींच्या विकासाकडेही अधिक प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध होतील.
  • केळी पिकांच्या जैवविविधता जपणे आवश्यक आहे. पूर्वी केळीच्या जंगली प्रजातीमध्ये पनामा रोगाविरुद्ध प्रतिकारकता होती. मात्र, ग्रॉस मायकेल जातीच्या आगमनानंतर जुन्या केळी जाती लागवडीतून बाहेर पडत गेल्या.
  • जीएम साठी अद्यापही अडचणी गेल्या नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलिया येथील संशोधकांनी टीआर४ प्रतिकारकतेचा जंगली जातीतील जनूक कॅव्हेंडिश जातीमध्ये मिसळला होता. त्याचे निष्कर्षही चांगले आहेत. हे खरे असले तरी खाद्य पिकांमध्ये जनुकीय सुधारीत जातींसाठी अनेक देशांचे दरवाजे अद्यापही खुले नाहीत. त्यामुळे विक्रीमध्ये अडचणी होण्याचीच अधिक शक्यता गेर्ट व्यक्त करतात. विक्रीवरही परिणामाची शक्यता केळी विक्री व्यवसायामध्येही मोठे बदल घडत आहे. कॅव्हेंडिश केळींना स्थानिक पातळीवर प्रति केळी ६५ सेंट असा दर असून, स्टारबक्स येथे एक डॉलर मिळतो. मात्र, युरोपियन सुपरमार्केटमध्ये प्रति किलो केळीला केवळ १ युरो मिळतो. रोगाचा प्रसार प्रति वर्ष ४० ते ५० पट वेगाने होत असताना, त्याचा मोठा ताण केळी व्यवसायावर येत असल्याचे गेर्ट यांनी सांगितले.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com