agricultural stories in marathi, agro vision, MSU offers self-paced online greenhouse courses | Agrowon

अमेरिकेत सुरू झाले हरितगृहविषयक ऑनलाइन कोर्सेस
वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठातील विस्तार विभागाने उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन कोर्सेस सुरू केले आहेत. त्यात प्रामुख्याने हरितगृह आणि शोभेच्या वनस्पतीच्या लागवड व्यवस्थापनाचे प्रशिक्षण अंतर्भूत आहे. पूर्वमुद्रित (रेकॉर्डिंग) स्वरूपामध्ये असलेली माहिती ऐकता येते.

अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठातील विस्तार विभागाने उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन कोर्सेस सुरू केले आहेत. त्यात प्रामुख्याने हरितगृह आणि शोभेच्या वनस्पतीच्या लागवड व्यवस्थापनाचे प्रशिक्षण अंतर्भूत आहे. पूर्वमुद्रित (रेकॉर्डिंग) स्वरूपामध्ये असलेली माहिती ऐकता येते.

शेतीमधील प्रशिक्षणे ही प्रामुख्याने प्रात्यक्षिकांवर आधारित असावीत, असा संकेत आहे. त्यामुळे कृषी शिक्षणातील ऑनलाइन कोर्सेस हा विषय तसा भारतामध्ये दुर्लक्षितच आहे. मात्र अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठाने याबाबत आघाडी घेतली आहे. त्यांनी शेतीतील महत्त्वाच्या विषयांवर खास ऑनलाइन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी खास शैक्षणिक मटेरिअल छायाचित्रांसह तयार केले आहे.
या प्रशिक्षणामध्ये सामू (पीएच), क्षारता (ईसी) यांचे व्यवस्थापन, माध्यमांचे गुणधर्म आणि त्याचे पिकांवर होणारे परिणाम, प्रकाश व्यवस्था, जैविक नियंत्रण यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणासाठी परीक्षा असली, तरी गुणांचे बंधन ठेवण्यात आले नाही. शेतकरी आपल्या सवडीनुसार तीन महिन्यांपर्यंत यातील कोणतेही प्रशिक्षण पूर्ण करू शकतात. त्यासाठी नोंदणी करण्यासाठी प्रत्येकी १२९ डॉलर इतके शुल्क ठेवण्यात आले आहे. त्याची अंतिम तारीख १५ जून असून, एक जून ते ३१ ऑगस्ट या काळामध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. प्रकाश व्यवस्थेसंबंधीच्या स्पॅनिश कोर्स १ जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

...असे आहेत कोर्सचे विषय

  • मुळांच्या कक्षेचे व्यवस्थापन
  • हरितगृहातील जैविक नियंत्रण (इंग्रजी आणि स्पॅनिश दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध)
  • हरितगृह व फळबागेतील कृत्रिम प्रकाश व्यवस्था व त्याचे व्यवस्थापन (इंग्रजी आणि स्पॅनिश दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध)

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...