agricultural stories in marathi, agro vision, Mushroom get publicity in west canada | Agrowon

पश्‍चिम कॅनडामध्येही वाढतेय अळिंबीची लोकप्रियता
वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

कॅनडा येथे अळिंबी उत्पादनाला चालना दिली जात आहे. येथे वैशिष्ट्यपूर्ण अळिंबी उत्पादनासह विक्री व्यवस्था उभी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यातून कॅनडातील पश्‍चिमी बाजारपेठेतील अळिंबी विक्रीचा हिस्सा १४ टक्क्यांवरून वाढून ३५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे.

कॅनडा येथे अळिंबी उत्पादनाला चालना दिली जात आहे. येथे वैशिष्ट्यपूर्ण अळिंबी उत्पादनासह विक्री व्यवस्था उभी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यातून कॅनडातील पश्‍चिमी बाजारपेठेतील अळिंबी विक्रीचा हिस्सा १४ टक्क्यांवरून वाढून ३५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे.

अळिंबी हा प्रथिनांचा मोठा स्रोत असून, त्याचा आहारामध्ये वापर वेगाने वाढत आहे. नैसर्गिकरीत्या अळिंबी वाळलेल्या फांद्या, झाडे किंवा त्यांच्या मृत भागावर उगवते. मात्र, त्याचे उत्पादन घेताना विविध प्रकारच्या भुश्श्यांचा वापर केला जातो. लाकडाच्या भुश्श्यामध्ये मृत लाकूड असते. एन्व्हायरो मशरुम्स ही कंपनी लाकडाच्या भुश्श्यामध्ये विविध सेंद्रिय घटक मिसळत अळिंबीचे उत्पादन घेते. त्यासाठी खास क्युबेक, ब्रिटिश कोलंबिया आणि ओन्तुरियो येथील लाकडाच्या मिलमधून लाकडाचा भुसा मागवण्यात येत असल्याचे रॉबिन पार्क यांनी सांगितले. यामुळे अळिंबीला एक विशिष्ट अशी नैसर्गिक चव मिळत असल्याचा अनुभव पार्क सांगतात. त्यांच्या कंपनीमध्ये वर्षभर किंग ओयस्टर, एनओकी, ब्लॅक ओयस्टर, व्हाईय ओयस्टर आणि सामान्य ओयस्टर अशा अळिंबीचे उत्पादन घेतले जाते. दर आठवड्याला सुमारे १० हजार किलो किंग ओयस्टर आणि ४ हजार किलो ब्लॅक ओयस्टर अळिंबीची विक्री उत्तर अमेरिकेमध्ये केली जाते. या ठिकाणी असलेल्या खाद्य सेवा, वितरण विभागामध्ये ही सेवा पुरवली जाते. दरवर्षी सुमारे २.२५ दशलक्ष किलो उत्पादन दोन लाख वर्ग फूट क्षेत्रातून घेतले जाते.

उत्पादनासह पॅकेजिंगमध्ये सातत्य ः

  • चार वर्षांपूर्वी साध्या इमारतीमधून सुरू झालेल्या या कंपनीने मोठ्या क्षेत्रामध्ये आपले उत्पादन सुरू केले. सध्या त्यांना पूर्व कॅनडा विभागातील अन्य मोठ्या अळिंबी उत्पादकांशी स्पर्धा करावी लागते. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अळिंबीची आयात होते. आशियाई लोकांमध्ये अळिंबी खाण्याचे प्रमाण अधिक असून, पश्‍चिमी लोकांच्या आहारामध्ये अळिंबीचे प्रमाण वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी स्टोअरमध्ये विक्रीसोबतच अनेक वेळा अळिंबीच्या विविध भाज्या किंवा पदार्थ शिजवून त्यांचे प्रदर्शन केले जाते. त्याचा फायदा होत असल्याचे पार्क यांनी सांगितले.
  • सुरवातीला पश्‍चिम बाजारपेठेमध्येही केवळ १४ टक्के हिस्सा होता, तो आता हळूहळू वाढत असून, ३५ टक्क्यापर्यंत पोचला आहे. त्यासाठी पॅकेजिंगसह वितरण प्रणालीवर अधिक भर देण्यात येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...