नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्व

नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्व
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्व

गेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि अॅव्हाकॅडो ही फलत्रयी नेदरलॅंड येथील बाजारपेठेमध्ये वर्चस्व गाजवत आहे. ही फळे बहुतांश ब्राझीलमधून आयात केली जातात. त्याविषयी माहिती देताना कार्लोस अॅन्ड्रे यांनी सांगितले, की लिंबू आणि आंबा ही फळे ब्राझीलमधील प्रामुख्यान पेट्रोलिना शहराच्या परिसरातून येतात. अर्थात, आंब्याचे उत्पादन अन्य विभागामध्ये होत असले तरी ते स्थानिक बाजारातच विकले जाते. पेट्रोलिना येथून आयात केलेली फळे युरोपियन देसामध्ये प्रामुख्याने नेदरलॅंड, जर्मनी आणि स्पेनमध्ये विकली जातात. त्याचप्रमाणे कॅनडा, संयुक्त अरब अमिरात आणि काही वेळा रशियामध्येही पाठवली जातात. अलीकडे अनेक देशांनी प्रमाणिकरणाचे निकष कडक केले आहे. जर्मनीमध्ये कीडनाशकांच्या उर्वरित अवशेषांसंदर्भातील तपासण्या अत्यंत काटेकोर आहे. गेल्या काही वर्षाांपासून युरोपिय बाजारपेठेमध्ये अनेक कीडनाशकांच्या वापरावर निर्बंध आले आहे. त्यानुसार बहुतांश उत्पादक देशांनीही बदल केले आहेत. गेल्यावर्षी ब्राझीलियन निर्यातदारांना पेरू देशातील निर्यात होणार असल्याचा बातम्यांमुळे धक्का बसल्याचे अॅण्ड्रे यांनी सांगितले. पेरू देशातील वातावरण चांगले असल्याच्या स्थितीमध्ये बाजारात त्यांची फळे लवकर येतात. त्यांच्या फळांची गोडी व दर्जा तुलनेने कमी असला तरी त्यांना फायदा होतो. गेल्या पाच वर्षांपासून दक्षिण अमेरिकेमध्ये वातावरणामध्ये बदल होत आहे. त्यामुळे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे चित्र आहे. ब्राझील येथील उत्पादन नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च असते. झाडांवर पिकलेल्या फळांचा स्वाद मिळतो उत्तम ः जागतिक बाजारात ब्राझीलियन आंबा फळांची मागणी स्थिर असते. या फळांचा दर्जा उत्तम असून, चांगल्या वातावरणाचा फायदा होतो. रंग, गोडी आणि आकार चांगला मिळतो. त्याचप्रमाणे वर्षभर आंबा पुरवठा करण्याची ब्राझीलची क्षमता आहे. त्यांचे केथ आणि पाल्मर आंबे हे वर्षभर उपलब्ध असतात. टॉमी अॅटकिन्सला कायम काही प्रमाणात मागणी असते. ब्राझीलियन केंट आंबे वर्षाच्या अखेरीला म्हणजे नोव्हेंबरमध्ये बाजारात येतात. अलीकडे पिकलेल्या व खाण्यासाठी तयार असलेल्या फळांची मागणी वाढली आहे. अशाप्रकारे झाडांवर पिकलेल्या फळांची गोडी आणि रंग चांगला मिळतो. वर्षभर कायम पुरवठा करण्याची क्षमता असल्याने पाल्मर आंब्याची निर्यात प्रामुख्याने करत असल्याचे अॅण्ड्रे यांनी सांगितले. लिंबू सालीच्या रंगाचा बाजारावरील परिणाम ः नेदरलॅंडमध्ये मुख्यतः तीन प्रदेशातून लिंबांची आयात केली जाते. त्यातील दी सावो पावलो आणि जैबा प्रदेशातील वर्षभर लिंबे येतात. वर्षाच्या पहिल्या चार महिन्यामध्ये, अमेझोनिया प्रांतांतून लिंबे येत असतात. कोणत्याही परदेशी फळांची मागणी ही मुख्यतः हवामानावर अंवलंबून असते. त्यातही सूर्यप्रकाश आणि कोरडे वातावरण असल्यास थोडी वाढ होते. दक्षिण युरोपातील विशेषतः स्पेन आणि फ्रान्स हे लिंबांचे मुख्य खरेदीदार आहेत. फ्रेच, स्पॅनिश आणि पोर्तुगाली लोक ब्राझिलियन लिंबांना प्राधान्य देतात. कारण, ते सालीच्या रंगाऐवजी रसाकडे लक्ष देतात. हे खरे असले तरी लिंबाच्या बाजारामध्ये सालीचा रंग हा निर्णयातील महत्त्वाचा घटक आहे. मेक्सिकन लिंबांचा रंग चमकदार हिरवा असतो, तर अन्य देशातून येणाऱ्या लिंबाचा अधिक पिवळा असतो. सामान्यत पिवळ्या रंगाच्या लिंबे बाजारात टाळण्याचा प्रयत्न असतो. ब्राझिलियन लिंबांचा रंग ही हलका हिरवा असतो. आमच्या जाती या रस किंवा सरबतापेक्षाही स्वयंपाकामध्ये अधिक वापरल्या जातात. कारण, सालीच्या रंगापेक्षा त्यातील रस हा महत्त्वाचा असतो. रंगामुळे आतील रसावर कोणताही परिणाम होत नाही. जेव्हा लिंबे शिळी होऊन कुजण्यास सुरवात होते, तेव्हाच त्याचा परिणाम आतील रसाच्या वासावर होतो. लॅटीन देशामध्ये लिंबाच्या सालीच्या रंगाकडे फारसे लक्ष देत नाहीत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com