नत्रवाहक जनुकांच्या साह्याने भातातील नत्र वापर होईल कार्यक्षम

नत्रवाहक जनुकांच्या साह्याने भातातील नत्र वापर होईल कार्यक्षम
नत्रवाहक जनुकांच्या साह्याने भातातील नत्र वापर होईल कार्यक्षम

नत्रवाहक जनुक ओएसएनआरटी१.१ ए (OsNRT१.१A) याच्या साह्याने भाताची पक्वता लवकर करणे शक्य होऊ शकते. या संशोधनामुळे उत्पादन वाढीला चालना मिळणार असून, अतिरिक्त नत्रयुक्त खतांमुळे होणारे प्रदूषण रोखणे शक्य होईल. नत्रयुक्त खतांच्या वापरामुळे पिकांच्या उत्पनादमध्ये वाढ होत असली तरी अतिरिक्त वापराचे पर्यावरण आणि पिकांवरही विपरीत परिणाम होऊ शकतात. उदा. भात पिकामध्ये अतिरिक्त नत्राच्या वापरामुळे फुलोरा अवस्था लांबणीवर पडते, तसेच पीक उशिरा येणाऱ्या थंडीला बळी पडू शकते. भात पिकातील नत्राचे वहन करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावणाऱ्या घटकाची ओळख पटविण्यामध्ये संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामुळे भात पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच फुलोरा प्रक्रियेला चालना देणे शक्य होणार आहे. उशिरा पक्वता येण्यापासून रोखल्यामुळे वेळेमध्ये बचत होणार आहे. नत्रयुक्त खते ही सामान्यतः नायट्रेट NO३- किंवा अमोनिकल NH४+ स्वरूपामध्ये दिली जातात. त्यामुळे एकरी उत्पादनामध्ये वाढ होते. मात्र, भातासारख्या पिकामध्ये वाहत्या पाण्यासोबत नत्र वाहून परिसरातील जलस्रोत प्रदूषित होऊ शकतात. गव्हासारख्या पिकामध्ये अतिरिक्त केलेल्या नत्र हवेत मिसळले जाऊन हवेच्या प्रदूषणाचा धोका वाढतो. या दोन्ही महत्त्वाच्या पिकामध्ये एकूण वापरलेल्या नत्रयुक्त खतांच्या सुमारे ४० टक्के खते पिकांना उपलब्ध होतात. उर्वरीत खते ही पाण्यामध्ये किंवा हवेमध्ये जातात. नत्रयुक्त खतांच्या वापरामुळे फुलोरा लांबणे, थंडीसाठी पीक संवेदनशील होणे अशा बाबी पिकांमध्ये दिसून येतात. या दोन्ही घटकांचा फटका पिकाच्या उत्पादनाला अप्रत्यक्षरीत्या बसतो. पिकाला उशीर झाल्यामुळे दोन किंवा तीन पिकांच्या पॅटर्न राबवता येत नाही.

  • वाग आणि सहकाऱ्यांनी केलेल्या भातावरील संशोधनामध्ये नायट्रेट ट्रान्सपोर्टर (एनआरटी) ओळखण्यात आले आहे. पिकामध्ये जमिनीतून मुळाद्वारे नत्र संयुगे उचलून पुरविण्याचे काम हे वाहक करतात. भातातील OsNRT१.१A हे घटक नत्राचा वापर आणि फुलोरा अवस्था या दोन्हीवर परिणाम करतात. संशोधनामध्ये या घटकांचे कार्य थांबवल्यानंतर नायट्रेट आणि अमोनियम उचलण्याचे व वहनाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले. अशा म्युटंट पिकांमध्ये सामान्य पिकाच्या तुलनेमध्ये दाण्याचे प्रमाण ८० टक्क्याने कमी झाल्याचे दिसून आले.
  • मग संशोधकांनी अधिक प्रमाणात OsNRT१.१A निर्मिती करणाऱ्या भाताची जात तयार केली. ही रोपे तेवढ्याच नत्र पुरवठ्यामध्ये अधिक उंच, हिरवी आणि बायोमास निर्माण करू लागली. हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्येही या रोपांनी अधिक नत्र उचलले.
  • अनेक वर्षांच्‍या या चाचणीमध्ये अधिक प्रमाणात OsNRT१.१A निर्मिती करणाऱ्या भाताचे नत्राच्या कमी अधिक वापरानुसार ३० टक्क्यांपासून ६० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे ही रोपे सामान्य भाताच्या तुलनेमध्ये एक ते दोन आठवडे लवकर फुलोऱ्यामध्ये आली.
  • या संशोधनाविषयी माहिती देताना चेंगसाय चू यांनी सांगितले, की गेल्या १०० वर्षांपासून नत्र खतांचा वापर हा पिकांच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचा घटक राहिला आहे. प्रति वर्ष सुमारे १२० दशलक्ष टन नत्रयुक्त खतांचा वापर होतो. त्यातील बहुतांश भाग हा हवा किंवा पाण्यामध्ये मिसळून प्रदूषणास कारणीभूत ठरतो. गवतवर्गीय अर्बिडॉप्सीस वनस्पतीमध्ये एनआरटीचे अधिक कार्यान्वयन बियांच्या उत्पादनाबरोबरच मोठ्या पानांमध्ये नत्राचा योग्य उपयोग होण्यासाठी फायद्याचा दिसून आले. प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष शेतामध्ये विविध ठिकाणी अनेक वर्षे केलेल्या चाचण्यातून हे सिद्ध झाले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com