agricultural stories in marathi, agro vision, new black corn products prove very popular | Agrowon

चीनमध्ये काळ्या मक्याच्या उत्पादनाला वाढतेय मागणी
वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

आपल्याला नेहमीच्या मक्यापासूनची विविध उत्पादने माहीत आहेत. त्यांचा वापरही मानवी आणि पशुआहारामध्ये केला जातो. मात्र, चीनमध्ये काळ्या रंगाच्या मक्याची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. परिणामी, काळ्या रंगाच्या मक्याच्या लागवडीला चालना मिळत आहे.

आपल्याला नेहमीच्या मक्यापासूनची विविध उत्पादने माहीत आहेत. त्यांचा वापरही मानवी आणि पशुआहारामध्ये केला जातो. मात्र, चीनमध्ये काळ्या रंगाच्या मक्याची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. परिणामी, काळ्या रंगाच्या मक्याच्या लागवडीला चालना मिळत आहे.

गडद रंगाच्या पिगमेंटमुळे या मक्यामध्ये अधिक पोषक गुणधर्म असतात, तसेच त्यातील साखरेचे प्रमाण ११.९५ टक्के असून, सामान्य मक्याच्या तुलनेत एक ते तीनपट अधिक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काळ्या रंगाच्या मका लागवडीमध्ये वेगाने वाढ झाली आहे. आधी बहुतांश शेतकरी पारंपरिक काळ्या मक्याच्या जातींची लागवड करत असत, पण त्याचे उत्पादन कमी असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसे.

अलीकडे विविध जातीही उपलब्ध होत असून, त्यातील क्षिन जून हे अॅन्थोसायनिन ब्लॅक स्विट १ या जातीखालील क्षेत्र अधिक आहे. ही अधिक उत्पादनक्षम संकरित जात असून, चवीलाही अधिक गोड आहे. सामान्यतः पीक ८५ ते ९० दिवसांमध्ये पक्वता गाठते. अगदी वाळवण्यासह कालावधी ११५ दिवसांपर्यंत जातो. त्याचप्रमाणे काढणीच्या वेळी या मक्याच्या दाण्यांचा रंग हा लाल-जांभळा असतो. पुढे प्रक्रियेदरम्यान शिजवल्यास त्याला अधिक आकर्षकता मिळते. परिणामी, विविध प्रक्रिया उत्पादनामध्ये या मका जातीला अलीकडे प्राधान्य दिले जात आहे.

या काळ्या रंगाचा मका वाळवून त्यापासून पीठ तयार केले जाते. या पिठाचा वापर बेकरी उद्योगामध्ये वाढला आहे. चीनसह हॉंगकॉग व अन्य देशांमध्ये या उत्पादनांना चांगली मागणी आहे.

या जातीचे संकरीरित बियाणे बनवणाऱ्या कंपनीच्या प्रवक्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राधान्याने मका जातींच्या संकरित जातीच्या पैदाशीसोबतच बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. ही बियाणे चीनच्या पूर्व, उत्तर आणि नैर्ऋत्य भागांमध्ये व पिवळ्या नदीच्या परिसरात विकली जातात. त्याचप्रमाणे अन्य भाजीपाला पिकांच्या बियाणांची निर्मिती व विक्रीही कंपनी करत आहे.

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...