मक्यावरील करपा रोगाच्या जनुकांचा घेतला शोध

मक्यावरील करपा रोगाचा अभ्यास
मक्यावरील करपा रोगाचा अभ्यास

मक्यावरील करपा रोगाला प्रतिकार करणाऱ्या जनुकांचा शोध संशोधकांनी घेतला आहे. मात्र, तरीही बुरशीजन्य रोग मक्याच्या प्रतिकारशक्तीला धोका देऊन आपली वाढ करू शकतो. रोगाची बुरशी मका रोपांच्या प्रतिकारशक्तीवर कशा प्रकारे मात करते, याचा अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन ‘जर्नल फायटोपॅथॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. भविष्यामध्ये रोगाच्या नियंत्रणासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. मका पिकाच्या पानावरील करपा रोगामुळे हिरव्या तपकिरी रंगाची कणसे शेतामध्ये दिसून येतात. या रोगाचा प्रादुर्भाव लवकर लक्षात न आल्यास व नियंत्रणाचे उपाय न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. रोगकारक बुरशी ही सातत्याने स्वतःमध्ये बदल करून या प्रतिकारशक्तीला हुलकावणी देत असते. बुरशी आणि पीक हे सातत्याने एकमेंकाना जोखत असते. त्या कामामध्ये जनुके अत्यंत मोलाच्या भूमिका बजावतात. मका पिकामध्ये करपा रोगाच्या नियंत्रणासाठी यावर संशोधन करत असलेल्या इल्लिनॉईस विद्यापीठातील कृषीशास्त्र विभागातील वनस्पती रोगशास्त्रज्ञ सॅन्टीगो मायडेरोज यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, की मक्यामध्ये प्रादुर्भाव करण्यासाठी कारणीभूत असा बुरशीमधील जनुक शोधण्याचा आमचा प्रयत्न होता. अशी दोन जनुके शोधण्यात यश आले असून, ते बुरशी आणि मका यातील समन्वयासाठी कारणीभूत ठरतात.

  • उत्तरेतील मक्यावरील करपा रोगांसाठी प्रतिकार करणारे Ht१, Ht२, Ht३, आणि HtN अशी अनेक जनुके आहेत. बुरशीपासून वाचविण्यासाठी प्रथिनांच्या सिग्नलचा वापर केला जातो. मात्र, त्यामागील नेमकी कार्यप्रणाली अद्यापही ज्ञात नाही. ज्या वेळी ही प्रतिकारशक्ती कमी पडते, त्यावेळी मका रोगांसाठी संवेदनशील बनत जातो.
  • जनुकांच्या माहिती साठ्यांतून बुरशीला पिकांमध्ये अंतर्भाव करण्यासाठी मदत करणाऱ्या जनुकांचा शोध घेतला. त्याची नेमकी जागा शोधली. एका बुरशीच्या कारणांमध्ये AVRHt१ जनुक कार्यरत होते, तर दुसऱ्या ठिकाणी AVRHt२ कार्यरत होते. या दोन्ही जनुकांचे मूलद्रव्यीय मार्कर ठरविण्यात यश आले आहे. त्यामुळे भविष्यात रोगकारक बुरशी प्रजाती ओळखणे शक्य होईल. तसेच वनस्पतींची प्रतिकारकता वाढविण्याच्या नव्या संशोधनाला फायदा होणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com