agricultural stories in marathi, agro vision, NUTRIENTFUL MEAL MAKE OLDERS STURDY | Agrowon

वृद्धापकाळातील नाजूकपणा कमी करण्यात आहार ठरेल महत्त्वपूर्ण
वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

मध्य पूर्वेतील देशांप्रमाणे फळे, भाज्या, पूर्णधान्ये, कडधान्ये व सुका मेवा यांचा आहारात समावेश असल्यास वृद्धत्वामध्ये भेडसावणाऱ्या नाजूक प्रकृतीचा धोका कमी करणे शक्य होते. या आहारामध्ये वृद्धापकाळामध्येही अधिक काळापर्यंत स्वावलंबी राहणे शक्य होऊ शकते. हे संशोधन ‘जर्नल ऑफ गेरियाट्रिक्स सोसायटी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मध्य पूर्वेतील देशांप्रमाणे फळे, भाज्या, पूर्णधान्ये, कडधान्ये व सुका मेवा यांचा आहारात समावेश असल्यास वृद्धत्वामध्ये भेडसावणाऱ्या नाजूक प्रकृतीचा धोका कमी करणे शक्य होते. या आहारामध्ये वृद्धापकाळामध्येही अधिक काळापर्यंत स्वावलंबी राहणे शक्य होऊ शकते. हे संशोधन ‘जर्नल ऑफ गेरियाट्रिक्स सोसायटी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

वार्धक्यामध्ये वाढत्या वयासोबत ताकद कमी होत जाते, तसतसे वजनामध्ये आणि स्नायूंच्या शक्तीमध्ये घट होते. परिणामी चक्कर येणे, हाडे ठिसूळ होणे, स्मरणशक्ती कमजोर होणे अशा अनेक समस्या उद्भवतात. यावर इंग्लंड येथील ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’ येथील संशोधक केट वॉल्टर्स आणि गोतारो कोजिमा यांच्या गटाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. या समस्येसाठी आरोग्यपूर्ण आहार अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याचे दिसून आले.
मध्य पूर्वेसह फ्रान्स, स्पेन, इटली आणि चीन येथील चार संशोधनामध्ये सुमारे ५७८९ लोकांच्या आहार आणि आरोग्याचे विश्लेषण केले. त्याविषयी माहिती देताना डॉ. वॉल्टर्स यांनी सांगितले, की ज्या व्यक्ती मध्य पूर्वेतील आहारांचा काटेकोरपणे पालन करतात, त्यामध्ये वृद्धापकाळी नाजूकपणाची समस्या कमी उद्भवतात. हे प्रमाण अर्ध्यापेक्षाही कमी राहत असल्याचे दिसून आले. या अभ्यासामध्ये मध्य पूर्वेतील लोकांप्रमाणे अधिक फळे, भाज्या, पूर्ण धान्ये, कडधान्ये आणि सुका मेवायुक्त अशा सातत्यपूर्ण आहारामुळे वृद्धांच्या स्नायूंची शक्ती, कार्यक्षमता, वजन आणि ऊर्जा पातळी कायम राहण्यास मदत होते.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...