agricultural stories in marathi, agro vision, nutritions in vegetable | Agrowon

एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या भाजीतील पोषक तत्त्वे
वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग, त्या भाज्यातील पोषक घटक अधिक प्रमाणात शोषला जाण्यासाठी फायद्याचा ठरत असल्याचे आयोवा विद्यापीठातील संशोधनामध्ये दिसून आले. हे निष्कर्ष ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग, त्या भाज्यातील पोषक घटक अधिक प्रमाणात शोषला जाण्यासाठी फायद्याचा ठरत असल्याचे आयोवा विद्यापीठातील संशोधनामध्ये दिसून आले. हे निष्कर्ष ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

परदेशामध्ये भाज्यांचे सॅलड तयार करतेवेळी, त्यामध्ये ड्रेसिंग म्हणून ऑलिव्ह किंवा अन्य तेलांचा वापर केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये स्थूलपणा रोखण्याच्या उद्देशाने हा तेलाचा वापर अत्यंत कमी होत गेला आहे. परंतु भाज्यातील बीटा कॅरोटीन आणि तीन अन्य कॅरोटिनॉईड्स या सारखी अनेक जीवनसत्त्वे ही तेलामध्ये अधिक चांगल्या प्रकारे मिसळली जातात. या तेलाद्वारे ती शरीरामध्येही चांगल्या प्रकारे शोषली जात असल्याचे आयोवा विद्यापीठामध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे.

आयोवा विद्यापीठातील अन्नशास्त्र आणि मानवी पोषकता विभागाचे सहयोगी प्रा. वेन्डी व्हाइट यांनी केलेल्या प्रयोगामध्ये कच्च्या भाज्यांच्या सॅलडमध्ये सोयाबीन तेलाच्या स्वरूपामध्ये फॅट वापरल्यास विविध प्रकारच्या आठ सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. त्याचा फायदा मानवी आरोग्यासाठी होतो. तेलाशिवाय नुसत्या खाल्लेल्या भाज्यांतील पोषक घटक शोषले जात नाहीत.

शरीरात शोषल्या जाणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची नावे ः
अल्फा व बीटा कॅरोटीन, ल्युटेन, लायकोपीन, दोन प्रकारची इ व के जीवनसत्त्वे. त्याच प्रमाणे अ जीवनसत्त्वाच्या शोषणासाठीही मदत होते.

इतर अॅग्रो विशेष
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र...नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा...
ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारणकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या...
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी...पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली...
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणारमुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा...नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही...
पेथाई चक्रीवादळ आज धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई...
कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागेजळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील...
धोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोजफळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध...
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...